उमरी शहरात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली.१ ली ते ७ वी इंग्रजी माध्यम शाळा खुलेआम सुरू
कोरोनाचे संकट संपते म्हणताच ओमीक्रोन या विषाणूंने प्रादुरभाव पसरण्यास सुरवात केली,त्यामुळे राज्य सरकारने ओमीक्रोन चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरी भागातील 1 ली ते 7 वी वर्गाची व ग्रामीण भागात 1 ली ते 5 वी वर्गाची शाळा 13 तारखे नंतर सुरू करण्यास जिल्हाधिकारी श्री विपीन इटनकर साहेब यांनी आदेश देऊन सुध्दा उमरी शहरातील 1 ली ते 7 वी साठी इंग्रजी माध्यम शाळा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत, केंद्रप्रमुख , विस्तारअधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्या कृपेमुळे उमरी शहरातील इंग्रजी माध्यम शाळा खुले आम चालू आहेत.त्याविषयी गटशिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता शहरातील कुठल्याच इंग्रजी शाळा सुरू नाहीत असे सरळसरळ तपासणी न करता त्यांनी विधान दिले,पण शहरातील सर्वच नागरिकांना इंग्रजी माध्यम शाळा सर्रास पणे सुरु आहेत हे दिसत असताना शासकीय शाळाना वेगळा नियम का? शासकीय शाळा बंद का? असा प्रश्न पालकांना पडला आहे.इंग्रजी माध्यमातील शाळे पेक्षा जास्त शासकीय शाळांमध्ये गोरगरिबांचे पाल्य शिक्षण घेतात मग इंग्रजी माध्यम शाळेतील विद्यार्थ्यांना एक नि...