“आम्हाला अधिकार नाही!” — मग बळेगावची माती लुटण्याचे अधिकार कुणाला?
नायगाव बाजार -- गोविंद नरसीकर उमरी तालुक्यातील बळेगाव येथे सध्या मातीच्या बेसुमार उत्खननाने कळस गाठला आहे. दिवसाढवळ्या, सर्वसामान्यांच्या डोळ्यासमोरून दररोज वीस ते पंचवीस मोठ्या हायवा टिपरमधून आठ ते दहा ब्रास माती खुलेआम वाहतूक केली जात आहे. विशेष म्हणजे तहसीलदार यांना या बेसुमार माती उत्खननाच्या मोबदल्यात मोठी आर्थिक उलाढाल झाल्याचं चर्चा होत आहे. ही वाहतूक कोणत्याही भीतीशिवाय, बिनधास्तपणे सुरू आहे. या माती वाहतुकीसाठी दिल्या जाणाऱ्या पावत्यांवर ना तारीख आहे, ना वेळ, ना किती ब्रास माती आहे याची नोंद. म्हणजेच शासनाच्या महसुलावर थेट डल्ला मारला जात असून पर्यावरणाची सर्रास पायमल्ली होत आहे. तरीही संबंधित यंत्रणा गप्प का? याबाबत जबाबदार कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता, धक्कादायक उत्तर समोर आले. “आम्हाला वाळू किंवा माती वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याचे अधिकारच नाहीत,” असे एका कर्मचाऱ्याने सांगितले. हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. जर महसूल विभाग, ग्रामपंचायत, मंडळ अधिकारी किंवा इतर संबंधित कर्मचाऱ्यांना अधिकारच नाहीत, तर मग हे अधिकार दिले कुणाला आहेत? की माती माफियांना मोकळे रान देण्या...