ध्येय निश्चित असेल तर फक्त जिद्दीने अभ्यास सुरू करा यश मिळणारच : प्रा बानूगडे पाटीलमहाब्रँड आयआयबी तर्फे आयोजित “इंस्पायर” कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या अतिप्रचंड प्रतिसादाने संपन्न
नांदेड – प्रतिनिधी येथील चांदोजी पावडे मंगलकार्यालयात सुप्रसिद्ध प्रबोधनकार, इतिहास अभ्यासक, लेखक, प्रेरणादायी वक्ते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना जिद्द,प्रेरणा व निरंतर कष्ट या त्रिसूत्री आधारलेल्या अनेक उदाहरणांसह विविधांगी मार्गदर्शन केले यावेळी विद्यार्थी,पालकांसह आयआयबीच्या संपूर्ण टिमची उपस्थिती होती.. ज अमोघ वर्क्तत्वासाठी सुप्रसिद्ध असलेल्या प्रा.बानगुडे यांनी विद्यार्थ्यांना आपले ध्येय निश्चित करून त्यासाठी कठोर आणि सातत्यपूर्ण कष्ट करण्याची ठेवा जितके कष्ट जास्त यश तितकेच मोठे असते तसेच आपण जिंकणार म्हणजे जिंकणारच अशी पक्की खूण मनाशी बांधा मग बघा यश हे तुमचेचं असेल असे ते म्हणाले पुढे बोलतांना ते म्हणाले की, कुठलेही काम लहान नाही म्हणून समोर आलेल प्रत्येक काम हे महत्वाचं असतं त्यामुळे प्रत्येक काम हे मन लावून करा म्हणजे मनापासून केलेल्या कामाला निभावलेल्या जबाबदारीतून सर्वोत्तम यश तुमच्या जवळ असेल यावेळी मुख्यवक्ते प्रा.नितीन बानूगडे पाटील यांचा आयआयबी बद्दल डॉक्टर्स फॅक्टरी असा गौरवपूर्ण उल्लेख आपल्या व्याखानात केला.. ...