१० वीतून ११ वीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 'आयआयबी फास्ट' चे ऑफलाईन पद्धतीने २ एप्रिल रोजी आयोजन.. इयत्ता ११ वी प्रवेशासाठी २ एप्रिल रोजी ७ ही शाखेत होणार "आयआयबी-फास्ट"
नांदेड -- प्रतिनिधी : इयत्ता १० वीची परीक्षा देऊन नीट ची तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच नीट व जेईई परीक्षेची संपूर्ण तयारी करण्यासाठी व आपलं भविष्य उज्वल करण्यासाठी, इंजिनीयर किंवा डॉक्टर बनण्याचा खडतर मार्ग अगदी सोपा करण्यासाठी आयआयबी करिअर इन्स्टिट्यूट कडून इयत्ता ११ वी प्रवेशासाठी महाराष्ट्राचा महाब्रांड आयआयबी करिअर इन्स्टिट्यूट ची आयआयबी फास्ट (फ्री ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट) रविवार, दि.२ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे. तरी आपल्या भविष्यातील डॉक्टर, इंजिनिअर होण्याच्या ध्येयाला गवसणी घालण्यासाठी लवकरात लवकर आयआयबी फास्ट परीक्षेसाठी नोंदणी करा असे आवाहन टीम आयआयबीकडून करण्यात आले आहे. देशात सर्वाधिक डॉक्टर घडविणारी संस्था म्हणून नावलौकिक मिळविलेली आयआयबी करियर इन्स्टिट्यूट ही डॉक्टर इंजिनिअर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना त्यांच्या ध्येया पर्यंत पोहचविण्याचे कार्य मागील तब्बल २३ वर्षांपासून करत आहे. आजमितीला आयआयबी इन्स्टिट्यूटच्या शाखेचे जाळे महार...