चूलीत गेले तुमचे शिक्षण, प्रसिध्द डॉ.अरुण गोधमगावकर यांचे वृद्धाश्रमातच निधन
डाॅ. अरुण गोधमगांवकर सर, हे एक नामांकित बालरोग तज्ञ डॉक्टर होते.त्यांनी आयुष्यभर अनेक बालकांना जीवनदान दिले. ते मागील अनेक दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील रुक्मिणी.वृद्धाश्रमात राहत होते, ते नांदेड जिल्ह्यातील मूळचे नायगाव तालुक्यातील गोधमगाव चे होते, परंतु ते नंतर बिलोलीला स्थायिक झाले होते ते स्वतःच्या मुलाला एम. डी. डॉक्टर व मूलीलाही स्री रोग तज्ञ डॉक्टर करून, काही वर्षापू्र्विच त्या दोघांनाही अमेरीकेला पाठवले होते, सून व जावई ते पण डॉक्टरच आहेत, सगळेच आपापल्या जीवनात व्यस्त असल्याने, आई वडीलाकडे लक्ष द्यायला कोणिच रिकामे नव्हते. उतारवयात डॉक्टर साहेबांच्या पत्निचे निधन झाले, त्यावेळेस देखील अमेरिका मधून त्यांचा ना मूलगा आला, ना ही मूलगी आली, मग गावकऱ्यांनी अंत्यसंस्कार केले. Nत्यानंतर डॉक्टर साहेब लातूर जिल्ह्यातील अहमदपूर य़ेथे रुक्मिणी वृद्धाश्रम मध्ये रहायला गेले, चार वर्षाचा काळ तेथे व्यतीत केला, आणि नुकतेच डॉ.अरुण गोधमगावकर सर यांचे दुःखद निधन झाले, वृद्धाश्रम चालकाने त्यांच्या अमेरीकास्थीत मुलगा, मुलगी आणि जावई यांना निरोप कळवला, परंतु ...