पोस्ट्स

डिसेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विद्यार्थ्यांसाठी आयआयबी इन्स्पायर व्याखानाचे आयोजनप्रेरणादायी वक्ते प्रबोधनकार प्रा. नितीन बानुगडे पाटील करणार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

इमेज
नांदेड प्रतिनिधी -मेडकील व इंजिनीयर प्रवेशासाठी अग्रगण्य संस्था असलेल्या आयआयबीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आयआयबी इन्स्पायर व्याख्यानाचे आयोजन येत्या 12  डिसेंबर रोजी नांदेड व लातूर या दोन्ही ठिकाणी करण्यात आले असून विद्यार्थी कसा असावा व त्याने स्पर्धेला कसे सामोरं जावे यासह विद्यार्थ्यांशी निगडीत अशा अनेक विषयावर व समस्यांवर प्रा.बानुगडे पाटील मार्गर्शन करणार असल्याची माहीती आयआयबीचे  मुख्य कार्यकारी संचालक दशरथ पाटील यांच्या वतीने देण्यात आली आहे .            आयआयबी च्या वतीने नांदेड येथे मंगळवार दि 12 रोजी सकाळी साडेदहा वाजता डी मार्ट जवळील कॅनॉल रोडवरील चांदोजी पावडे मंगलकार्यालयात तर लातूर येथे सावेवाडी येथील दिवाणजी मंगल कार्यालयात सायंकाळी साडेपाच वाजता, या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या अटीतटीच्या वेगवान स्पर्धेच्या काळात आपला विद्यार्थी टिकावा तसेच त्याच्यावर समाजशिल संस्कार व्हावेत या हेतूने इन्स्टिट्यूट कडून सातत्याने विविध उपक्रम राबवले जातात त्याचाच एक हा भाग म्हणून मागील दोन दशकापेक्षा जास्त काळा...