सर्वाधिक एमबीबीएस सिलेक्शन देण्यात आयआयबी ठरणार महाराष्ट्रात अव्वल
औरंगाबाद – वैद्यकीय शिक्षणासाठी महत्त्वाच्या असलेल्या नीट २०२५ परीक्षेत आयआयबी (IIB) ने आपली सर्वोच्च गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. यंदा आयआयबीच्या विद्यार्थ्यांनी केवळ उच्च गुणच नव्हे तर प्रभावी कॅटेगिरी रँकसह आपली गुणवत्ता अधोरेखित केली आहे. नीट परीक्षा ही एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, बीएससी नर्सिंग यांसारख्या वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीची भारतातील एकमेव प्रवेश परीक्षा आहे. यंदाही देशभरातील लाखो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या या परीक्षेत आयआयबी ने आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली आहे. 🔸 प्रखर निकाल – गुणवत्तेचा ठसा नीट २०२५ मध्ये श्रेयस डमके (६१३ गुण – रँक १८४), बोदडे स्वरूप (६११ – रँक २०९), केंद्रे अपूर्वा (६०६ – रँक २९७), भेन्डेकर कार्तिक (६०४ – रँक ३३९) यांनी राष्ट्रीय पातळीवर आपली छाप पाडली. तसेच प्रियांशु मनोहर (५९६), खाकरे हर्षद (५९४), मुटकुळे शिवम (५९१), गांधी आयुष (५८९), वाघमारे मकरंद (५८३), खर्चे रोहन (५७८), शेख हुजेफ (५७९), कोकणे क्षिती (५७८), उम्बरेकर यश (५७७), चव्हाण मयांक (५७५) हे विद्यार्थीदेखील उल्लेखनीय यशाचे मानकरी ठरले आहेत. ...