पोस्ट्स

जानेवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मनूर खून प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करा-महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेची मागणी

इमेज
मनूर प्रकरणातील आरोपीला 24 तासात अटक करा, अन्यथा महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने राज्यात आंदोलन, संबंधित अधिकाऱ्यांना दिले निवेदन, उमरी प्रतिनिधी  उमरी तालुक्यातील मनूर या गावात आर्य वैश्य समाजातील समाज बांधवांना स्वस्त धान्य दुकानदाराच्या मुलाकडून खून करण्यात आला आहे. या खून प्रकरणातील आरोपीला राजाश्रय मिळत असून आरोपी हे फरारी आहेत, आरोपींना तत्काळ अटक करावी, स्वस्तधान्य दुकानाचा परवाना कायम रद्द करावा, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात महासभा आणि आर्य वैश्य समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड, तहसीलदार माधवराव बोथीकर, पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांना या संबंधाने निवेदन देण्यात आले आहे. महासभेचे राज्य व जिल्ह्यातील असंख्य पदाधिकारी मनूर गावात भेट देऊन पोलावार परिवाराचे सांत्वन केले आहे. याप्रसंगी नांदेड जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार कुंचनवार, राज्य संघटन प्रमुख प्रदीप कोकडवार, राज्य प्रसिद्धीप्रमुख नरेंद्र येरावार ,राज्य उपाध्यक्ष नंदचकुमार मडगुलवार, जिल्हा सचिव प्रवीण काचा...