मनूर खून प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करा-महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेची मागणी

मनूर प्रकरणातील आरोपीला 24 तासात अटक करा,
अन्यथा महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने राज्यात आंदोलन, संबंधित अधिकाऱ्यांना दिले निवेदन, उमरी प्रतिनिधी
 उमरी तालुक्यातील मनूर या गावात आर्य वैश्य समाजातील समाज बांधवांना स्वस्त धान्य दुकानदाराच्या मुलाकडून खून करण्यात आला आहे. या खून प्रकरणातील आरोपीला राजाश्रय मिळत असून आरोपी हे फरारी आहेत, आरोपींना तत्काळ अटक करावी, स्वस्तधान्य दुकानाचा परवाना कायम रद्द करावा, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात महासभा आणि आर्य वैश्य समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड, तहसीलदार माधवराव बोथीकर, पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांना या संबंधाने निवेदन देण्यात आले आहे.
महासभेचे राज्य व जिल्ह्यातील असंख्य पदाधिकारी मनूर गावात भेट देऊन पोलावार परिवाराचे सांत्वन केले आहे.
याप्रसंगी नांदेड जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार कुंचनवार, राज्य संघटन प्रमुख प्रदीप कोकडवार, राज्य प्रसिद्धीप्रमुख नरेंद्र येरावार ,राज्य उपाध्यक्ष नंदचकुमार मडगुलवार, जिल्हा सचिव प्रवीण काचावार,
प्रवीण चन्नावार, किशोर पबितवार, आदिनाथ गंगावार, पवन गादेवार, साईनाथ मेडेवार, साईनाथ कामीनवार , परेश चिंतावार, सुरेश येरावार,नरसिंग मुक्कावार, राम पत्तेवार, पांडुरंग महाजन, विजय पांपटवार, सुधीर उत्तरवार, गजानन चौधरी, अनिल सिरमवार, सुवेश पोकलवार, प्रशांत पोपशेटवार, विवेक काचावार, महेश पोलावार, बालाजी येरावार, राम येरावार, बालाजी कोंडावार, गजानन पोलावार,प्रमोद पोलावार, मनोज कोडगिरे, राम बिजमवार, साईनाथ काचावार, केशवराव उत्तरवार, निलेश पबितवार, गंगाप्रसाद पोलावार, दामोदर लाभसेटवार, श्याम लाभसेटवार, गिरिष पोलावार, शंतनु पोलावार, प्रवीण पोलावार, सोनू पोलावार, पंढरीनाथ दमकोंद्वार, साईनाथ बिजमवार, सुरेश पबितवार, अविनाश दासरवार, सचिन मामीडवार,गोविंद नलबलवार, अशोक मामिडवार,संतोष शिरूरकर, पवन पबितवार, दत्ताहरी पालदेवार, प्रसाद येरावार, दिलीप चिटमलवार, शंकर पिंपरवार, राघवेंद्र पबितवार, दत्तात्रेय लाभसेटवार, गणेश काचावार, विठ्ठल मुक्कावार, गिरीश निलावार, बालाजी बोपेवार, अमित उत्तरवार, व्यंकटेश धनपलवार, दयानंद कवटिकवार, लक्षण दमकोंडवार,संकेत मुक्कावार,संतोष मुक्कावार, कुणाल पबितवार, श्रीनिवास मुक्कावार, सचिन मुक्कावार, संजय निलावार, माणिकराव चिटमलवार, निलेश पबितवार, 
नंदू -याकावार, आदीसह महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे मुदखेड, भोकर, हिमायतनगर, बिलोली, धर्माबाद, नायगाव, बाराळी, मुखेड, जांब, सिंधी आदीसह जिल्ह्यातील आर्य वैश्य समाजातील बहुसंख्य समाज बांधव व मनूर गावातील सरपंचासह गावकरी 
उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सर्वाधिक एमबीबीएस सिलेक्शन देण्यात आयआयबी ठरणार महाराष्ट्रात अव्वल

भावी डॉक्टरांसाठी ११ डिसेंबर रोजी "IIB महा FAST"