पुणे, कोल्हापूर, औरंगाबादनंतर आता "आयआयबी अकोल्याला दाखल"
विदर्भातील विद्यार्थ्यांना मिळणार डॉक्टर-इंजिनिअर होण्याची योग्य दिशा ! नांदेड : डॉक्टर-इंजिनिअर होण्याचे अनेक विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे स्वप्न असते. मात्र, हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी केवळ ईच्छाचं नव्हे तर योग्य मार्गदर्शनाची आवश्यक असते. दरम्यान, देशभरात सर्वाधिक डॉक्टर देणाऱ्या आयआयबी इन्स्टिट्यूटने राज्यभर विद्यार्थ्यांना डॉक्टर-इंजिनिअर घडविण्याचा विडा उचलत आपल्या शाखेचे जाळे विस्तारित केले आहे. नांदेड, लातूर येथे उज्ज्वल यशाचे शिखर गाठल्यानंतर पुणे, कोल्हापूर आणि औरंगाबादनंतर विदर्भातील विद्यार्थ्यांच्या हितार्थ अकोला येथे आयआयबी इन्स्टिटय़ूटने आपली नवीन शाखा स्थापन केली असून या शाखेमुळे विदर्भातील विद्यार्थ्यांना डॉक्टर-इंजिनिअर होण्याची योग्य दिशा मिळणार आहे. देशात आज असे एकही एम्स मेडिकल कॉलेज किंवा इतर कोणते नामांकित वैद्यकीय महाविद्यालय नाही जेथे आयआयबी इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी शिक्षण घेत नाही, किंवा वैद्यकीय शिक्षण घेऊन एक निष्णात डॉक्टर म्हणून बाहेर पडला नाही. याचे मुख्य कारण म्हणजे मागील तब्बल २३ वर्षांपासून आयआयबी इन्स्टिट्यूट शै...