उमरी तालुक्यातील मनरेगा कामात कौट्यावधी चा भ्रष्टाचार मुख्याधिकारी यांच्या कार्यवाही कडे तालुक्याचे लक्ष
उमरी, ता. २५ (बातमीदार)मागील काही दिवसांपूर्वी हुंडा येथील शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष यांनी मनरेगा विभागातील इंजिनियर यांच्याकडून होणारी शेतकऱ्यांची लूट संबंधी विस्तार अधिकारी यांच्या दालनात शेतकरी यांच्या मार्फत चौकशीचे निवेदन देण्यात आले होते तेंव्हा उमरीचे तालुक्याचे विस्तार अधिकारी यांनी ह्याविषयी चौकशी करू असे सांगितले . उमरी पंचायत समितीचे कंत्राटी तांत्रिक सहायक व इतर कर्मचाऱ्यांच्या संगनमताने रोहयोच्या कामाचे तीनतेरा वाजवण्यात आले असून, सिंचन विहिरी, गायगोठे आणि शेततळ्याच्या कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. या भ्रष्टाचाराची गटविकास अधिकारी यांनी काही ठिकाणी जाऊन चौकशी केली असता संगनमताने केलेल्या भ्रष्टाचाराचे पितळ उघडे पडले आहे खरे पण त्यामुळे या भ्रष्टाचार करणाऱ्यांवर काय कारवाई होते याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. केंद्र सरकार गोरगरीब जनतेच्या हाताला काम मिळावे आणि शेतकऱ्यांच्या जीवनात प्रगती व्हावी यासाठी गायगोठे, सिंचन विहिरी आणि शेततळ्याचे कामे करण्याला प्राधान्य देत आहे; पण उमरी पंचायत समितीमध्ये सर्व सहमतीने रोहय...