उमरी तालुक्यातील मनरेगा कामात कौट्यावधी चा भ्रष्टाचार मुख्याधिकारी यांच्या कार्यवाही कडे तालुक्याचे लक्ष

उमरी, ता. २५ (बातमीदार)मागील काही दिवसांपूर्वी हुंडा येथील शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष यांनी मनरेगा विभागातील इंजिनियर यांच्याकडून होणारी शेतकऱ्यांची लूट संबंधी विस्तार अधिकारी यांच्या दालनात शेतकरी यांच्या मार्फत चौकशीचे निवेदन देण्यात आले होते तेंव्हा उमरीचे तालुक्याचे विस्तार अधिकारी यांनी ह्याविषयी चौकशी करू असे सांगितले . उमरी  पंचायत समितीचे कंत्राटी तांत्रिक सहायक व इतर कर्मचाऱ्यांच्या संगनमताने रोहयोच्या कामाचे तीनतेरा वाजवण्यात आले असून, सिंचन विहिरी, गायगोठे आणि शेततळ्याच्या कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. या भ्रष्टाचाराची गटविकास अधिकारी यांनी काही ठिकाणी जाऊन चौकशी केली असता संगनमताने केलेल्या भ्रष्टाचाराचे पितळ उघडे पडले आहे खरे पण त्यामुळे या भ्रष्टाचार करणाऱ्यांवर काय कारवाई होते याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले
आहे. केंद्र सरकार गोरगरीब जनतेच्या हाताला काम मिळावे आणि शेतकऱ्यांच्या जीवनात प्रगती व्हावी यासाठी गायगोठे, सिंचन विहिरी आणि शेततळ्याचे कामे करण्याला प्राधान्य देत आहे; पण उमरी पंचायत समितीमध्ये सर्व सहमतीने रोहयोच्या कामात भ्रष्टाचार करण्याचा सपाटा लावला आहे. बोगस मजूर, बोगस लाभार्थी दाखवून कंत्राटी तांत्रिक सहायक व मनरेगा विभागातील कर्मचारी रोहयोचा पैसा हडप करण्याचे काम करत आहे व कोट्यावधी रुपयांचा अपहार करत आहेत . उमरी तालुक्यात मनरेगा अंतर्गत होत असलेल्या सिंचन विहिरी, गायगोठा, शेततळे योजनेत तालुक्यातील शेतकऱ्यांना गायगोठा देतो असे म्हणून शेतकन्यांकडून संबंधित अधिकारी अगोदर पैसे नंतर योजना ही मोहीम राबवत आहेत. या योजनेअंतर्गत सिंचन विहीर घरकुल, गावातील सिमेंट रस्ते, पाणंद रस्ते, फळभाग, वृक्षारोपण, गायगोठे
आधीसह २६२ योजना आहेत. सदरील योजना अधिकारी वर्ग कागदोपत्रीच
दाखवत असून, त्याचे पूर्णपणे अंमलबजावणी अद्याप कोणत्याही गावातील शेतकऱ्यांकडून झालेले दिसून येत नाही. यामध्ये तांत्रिक कर्मचारी म्हणून नेमणूक झालेल्या अधिकाऱ्याने व मनरेगाचे कर्मचाऱ्याने व त्यांचे दलाल यांच्या तर्फे अनेक शेतकऱ्यांना विविध योजना देतो म्हणून हजारो रुपयांचा अपहार केल्याचे बोलले जात आहे. सदरील प्रकरणाची काही शेतकऱ्यांनी उमरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या निर्देशानात आणून दिले असता या सर्व बोगस बिलावर गटविकास अधिकारी पंचायत समिती उमरी यांची सह्या असल्याचे निदर्शनास आले. मग ह्या बोगस बिलांवर त्यांच्या सह्या कश्या व त्या  शेतकऱ्यांना पैसे मिळाले कसे ; परंतु काम मात्र अद्याप झालेले नसल्याने उमरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी प्रत्येक शेतकऱ्यांनी घेतलेल्या योजनेची चौकशी करण्यास सुरुवात केली असता सदरील उमरी पंचायत समितीचे मनरेगाचे धाबे दणाणले आहे. उमरी तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीने उमरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना ठराव देऊन गावातील बोगस कामांविषयी ठराव दिला. सदरील कामे ही बोगस असल्याने संबंधित अधिकान्यावर कारवाई करण्यात यावी, असे संबंधित ग्रामपंचायतचे म्हणणे आहे. जिल्हा परिषद नांदड कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल यांनी उमरी मनरेगात झालेल्या करोडो रुपयांच्या घोटाळाप्रकरणी चौकशी करणार काय, याकडे संबंध तालुक्याचे लक्ष लागले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सर्वाधिक एमबीबीएस सिलेक्शन देण्यात आयआयबी ठरणार महाराष्ट्रात अव्वल

भावी डॉक्टरांसाठी ११ डिसेंबर रोजी "IIB महा FAST"