पोस्ट्स

मार्च, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लोहगाव–किनाळा रस्त्याच्या मजबुतीकरणात निकृष्ट कामाचा आरोप; नागरिकांत तीव्र संताप

इमेज
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा *नायगाव बाजार -- गोविंद नरसीकर* येथून जवळच असलेल्या लोहगाव ते किनाळा या महत्त्वाच्या रस्त्याच्या मजबुतीकरणाच्या कामात गंभीर अनियमितता होत असल्याचा आरोप नागरिक व शेतकरी वर्गातून करण्यात येत असून या कामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अभियंते व ठेकेदार यांच्या संगनमताने अंदाजपत्रकानुसार दर्जेदार काम न करता मनमानी पद्धतीने काम सुरू असल्याने रस्ता किती दिवस टिकणार, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुमारे चार किलोमीटर लांबीच्या या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात रस्त्यावर अत्यल्प प्रमाणात डांबर टाकून कामाचा केवळ दिखावा केला जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. ‘निकृष्ट दर्जाचा उत्कृष्ट नमुना’ अशी उपहासात्मक प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत असून सध्या तयार होत असलेल्या रस्त्यावर सहज पायाने लाथ मारल्यास डांबर उखडून निघत असल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा प्रकारे तयार झालेला रस्ता पुढे...