उमरी धर्माबादच्या शेतकऱ्यांनसाठी रब्बी हंगामासाठी ऊर्ध्व पेनगंगेचे पाणी सोडा-मारोतराव कवळे
परतीच्या पावसामुळे उमरी धर्माबाद तालुक्यातील बहुतांश पिके वाया गेलेली असून शेतकऱ्यांनच्या पदरी काहीच पडले नाही,त्यामुळे रब्बी पिकांसाठी तरी मायनरला पाणी सोडण्यात यावे अशी मागणी वि.पी.के. उद्दोग समूहाचे चेअरमन श्री मारोतराव कवळे यांनी ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प कार्यकारी अभियंता नांदेड यांच्याकडे केली आहे,कवळे गुरुजी यांनी जी शेतकऱ्यांची परतीच्या पावसामुळे जे अतोनात नुकसान हहले ते भरून तर काढता येत नाही या परतीच्या पावसात उडीद,मूग,सओयाबी,कापूस इत्यादी पिकांना बुरटा कडून कोमेजून गेलेत त्यामुळे जिरायत व बागायतदार शेतकरी यांना मोठा फटका सहन करावा लागला म्हणून येत्या रब्बी पिकासाठी तरी मेन मॉयनरचे पाणी नियोजनबद्ध पिकांना पाणी सोडून धर्माबाद व उमरी तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी कवळे गुरुजी यांनी उर्ध्व पेनगंगा प्रकल्प अभियंता नांदेड यांच्या केली आहे
त्यामुळे उमरी व धर्माबाद तालुक्यातील सिंचनाखाली येणाऱ्या अनेक गावातील शेतकऱ्यांना फायदा होईल मागील खरीब पिकांची थोडीफार उणीव भरून निघेल,त्यावेळी निवेदन देताना कांग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते नागोराव पाटील रोषनगावकर,उमरी भाजप पक्षाचे नूतन उपाध्यक्ष सुधाकरराव देशमुख धानोरकर व कृषी संचालक धर्माबाद राजू पाटील बोळसेकर ,पांडुरंग पाटील वाघालवाडेकर,दत्ताराम पाटील,हरेगावकर सतीश पाटील शिंदे,अनंत पाटील बोळसेकर आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा