उमरी तालुक्यात एक रुपयात पीक विमा: अर्ज भरण्यासाठी शंभर-दोनशे रुपये !

नांदेड (उमरी) : एक रुपया पीक विमा योजनेत देगलूर शहरात व तालुक्यात शेतकऱ्यांची होत आहे. या योजनेचा लूट
अर्ज भरण्यासाठी विमा कंपनीकडून केंद्र चालकांना रक्कम दिली जाते, तरीही शेतकऱ्यांकडून सीएससी केंद्र चालक रक्कम आकारत असल्याच्या तक्रारी येत आहेत. विमा एक रुपयाचा आणि अर्ज भरण्यासाठी शंभर- दोनशे रुपये असा प्रकार अनेक ठिकाणी सुरू आहे. याबाबत शेतकऱ्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. पासून राज्यात २०२३ - २४ 'सर्वसमावेशक पीक विमा योजना राज्य शासनाच्या वतीने राबवण्यात येत आहे. त्याअनुषंगाने शेतकरी हिस्स्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून स्वतः तसेच बँक, विमा कंपनी प्रतिनिधी व सामूहिक सेवा केंद्र यांच्या मार्फत योजने नोंदणी करता येते. जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप २०२३ ते रब्बी २०२५-२६ या हंगामाकरिता तीन वर्षांसाठी निश्चित केलेल्या शेतातील, निश्चित केलेल्या पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरून शेतकऱ्याला केवळ एक रुपया भरून या योजनेत सहभागी होता येणार आहे. या योजनेसाठी सीएससीवर (सामूहिक सेवा केंद्र) अर्ज भरून घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. सीएससीवर अर्ज भरल्याबद्दल संबंधित केंद्र चालकांना विमा कंपनीकडून प्रति अर्ज ४० रुपये देण्यात येतात. तरीही उमरी शहरातील व तालुक्यातील काही केंद्रावर शेतकऱ्यांकडून अर्ज भरण्यासाठी शंभर- दोनशे रुपयांपर्यंतची रक्कम आकारली जात आहे.
शेतकऱ्यांनी संपर्क साधावा : कृषी विभाग तालुक्यात नव्हे तर राज्यात अशा प्रकारच्या तक्रारी वाढत चालल्याचे कृषी विभागानेच स्पष्ट केले आहे. पीक विमा योजनेचा अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांकडून अतिरिक्त रकमेची मागणी केल्यास केल्यास शेतकऱ्यांनी संबंधित पीक विमा योजनेचे कार्यालय, तहसीलदार, देगलूर तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सासऱ्याला मारणाऱ्या क्लास वन अधिकारी सुनेबद्दल धक्कादायक माहिती समोर, नागपूर पोलिसांची मोठी कारवाई

मनूर खून प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करा-महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेची मागणी

उमरी तालुक्यातील मनरेगा कामात कौट्यावधी चा भ्रष्टाचार मुख्याधिकारी यांच्या कार्यवाही कडे तालुक्याचे लक्ष