उमरी पत्रकार संरक्षण समितीच्या तालुका अध्यक्ष पदी अशोक झडते तर उपाध्यक्षपदी शेख आरीफ निमटेककर यांची निवड.
उमरी प्रतिनिधी
उमरी:-दि २५ उमरी येथे दोन दिवसांपूर्वीच बरखास्त झालेल्या पत्रकार संरक्षण समितीची आज दि २५ आक्टोबर रोजी तात्काळ बैठक घेउन नवीन समीती गठीत करण्यात आली आहे.
पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष मा विनोद पत्रे यांच्या आदेशानुसार या जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली उमरी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बांधवांना जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या व दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पत्रकार संरक्षण समिती उमरी यांची निवड करुन सर्व पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आहे नांदेड जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांच्या प्रमूख उपस्थित मध्ये कैलास सोनकांबळे यांची नांदेड जिल्हा कार्यकरणी सदस्य पदी निवड करण्यात आली व तसेच उमरी तालुका कार्यकरणी जाहीर करण्यात आली.पत्रकार संरक्षण समितीच्या तालुका अध्यक्षपदी अशोक झडते,तर उपाध्यक्ष पदी शेख आरिफ,सचिव पदी कैलास सूर्यवंशी, सहसचिव पदी शिवराज मोकनपले,कोषाध्यक्ष म्हणून उध्दव मामडे,सल्लागार बळवंत थेटे, संघटक पदी रईस पठाण, प्रसिद्धी प्रमूख म्हणून साईनाथ खंडारे व साहेबराव गव्हारकर, शंकर थेटे, चंद्रकांत नागेश्वर,यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.यावेळी पत्रकार संरक्षण समितीचे नांदेड जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड, नवनियुक्त जिल्हा सदस्य कैलास सोनकांबळे, अशोक झडते, शेख आरीफ, कैलास सुर्यवंशी,शिवराज मोकनपले,उध्दव मामडे, बळवंत पाटील थेटे,रईस पठाण, साहेबराव गव्हारकर, चंद्रकांत नागेश्वर, देवके साहेब,साईनाथ खांडरे,आदि पत्रकार बांधव उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा