धर्माबाद तालुक्यातील येवती मौजे येवती येथील रामचंद्र मंदिराची जमीन परत करा-सोनालीताई हंबर्डे (मराठवाडा भ्रष्टाचार ओबीसी असोसीएशयन अध्यक्ष)


धर्माबाद प्रतिनिधी -चंद्रकांत नागेश्वर

धर्माबाद :- अखिल भारतीय बहुजन ओबीसी अल्पसंख्याक भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षा सोनाली उर्फ ​​मंगल प्रकाश हंबर्डे यांनी धर्माबाद चे तहसीलदार दत्तात्रय शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की तालुक्यातील गट क्रमांक 302 आणि 349 हे रामचंद्र देवस्थानची जमीन आहे. येथील रमेश व्यंकटराव कुलकर्णी याने ताब्यात घेतले आहे. या गावातील लोकांनी आयुक्त धर्मदाय यांच्याकडे 1983 साली या जागेसाठी तक्रार केली. गावात दरवर्षी रामचंद्र उत्सव साजरा केला जात असे. पण हा सणही इथे होत नाही. येथील काही लोकांशी हातमिळवणी करून जमीन ताब्यात घेतली आहे. ही जमीन इनामी आहे आणि भोगवतदार वर्ग 3 ची भूमी आहे. परंतु सरकारनेही या तपासणीकडे दुर्लक्ष केले नाही. यांची दुसरी आणखी 20 एकर जमीन आहे. दुसरी 20 एकर जमीन असल्याने त्यांनी त्यांना भोगवतदार वर्ग 2 म्हणून जमीनही दिली आहे आणि ते कायद्याच्या विरोधात आहे. सरकारने ही जमीन रामचंद्र मंदिराच्या ताब्यात द्यावी,अशी मागणी सोनालीताईनी केली आहे.यामुळे याचा फायदा गरीब आणि भूमिहीन लोकांना होणार. म्हणूनच गावातील या जागेची तपासणी करुन गावकऱ्यांना सहकार्य  करावे अशी विनंती करण्यात आली असून सरकारने ही जमीन सार्वजनिक कामासाठी द्यावी,असे निवेदनात म्हटले आहे. अन्यथा असे नाही झाले तर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा सोनालीताई हंबर्डे यांनी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सासऱ्याला मारणाऱ्या क्लास वन अधिकारी सुनेबद्दल धक्कादायक माहिती समोर, नागपूर पोलिसांची मोठी कारवाई

मनूर खून प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करा-महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेची मागणी

उमरी तालुक्यातील मनरेगा कामात कौट्यावधी चा भ्रष्टाचार मुख्याधिकारी यांच्या कार्यवाही कडे तालुक्याचे लक्ष