कैलास सोनकांबळे यांची पत्रकार संरक्षण समिती जिल्हा कार्यकरणी पदी निवड
उमरी प्रतिनिधी
उमरी:-दि २५ उमरी येथे दोन दिवसांपूर्वीच उमरी पत्रकार संरक्षण समितीचे माजी तालुका अध्यक्ष कैलास सोनकांबळे यांच्यावर अविश्वास दाखवत पद व समीती बरखास्त करण्यात आली होती.
पण म्हणतात ना जिथे माणसाला कोणतरी निंदक सापडतो तिथुनच आपली प्रगतीची खरी सुरुवात होते या म्हणीप्रमाणे पत्रकार कैलास सोनकांबळे यांच्यासोबत असेच घडले कैलास सोनकांबळे यांच्या आजपर्यंतच्या कार्याची दखल पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे व जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी दखल घेत त्यांची निवड जिल्हा कार्यकारिणी सदस्य पदी करून विरोधकांना एक प्रकारचा जणु धक्काच दिला आहे आज दि २५ आक्टोबर रोजी तात्काळ बैठक घेउन उमरी येथे नवीन समीती गठीत करण्यात आली आहे.
पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष मा विनोद पत्रे यांच्या आदेशानुसार या जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली उमरी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बांधवांना जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या व दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पत्रकार संरक्षण समिती उमरी यांची निवड करुन सर्व पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आहे नांदेड जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांच्या प्रमूख उपस्थित मध्ये कैलास सोनकांबळे यांची नांदेड जिल्हा कार्यकरणी सदस्य पदी निवड करण्यात आली व त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा