एम.व्ही.के.कुसुमनगर वाघालवाडा गळीत हंगाम शुभारंभ संपन्न
उमरी प्रतिनिधी
ता.२५ बातमीदार
ऊस उत्पादक शेतकरी, कर्मचारी, व कारखान्याचे व्यवस्थापन तिन बाजु उत्कृष्ट भक्कम असल्यास ऊस गाळपाला आपण कमी पडणार नाही. यावर्षी या दोन्ही कारखानाच्या द्रवारे पावणेचार लाख टन ऊस गाळप करु, मी गेल्या वर्षी पहिला हाप्पता दोन हजार ने ऊसाचे बिल काढलो असलो तरीही आता राहिलेले पाचशे रुपये येत्या दहा तारखेला शेतक-यांच्या सरळ खात्यावर पैसे जमा होतील, गेल्या वर्षी शेतक-यांच्या ऊसाला आम्ही २५०० रुपये भाव दिलो बाजुच्या कारखान्याने २२००रुपये भाव दिला. अजुनही इतर साखर कारखाना पेक्षा शेतक-यांच्या ऊसाला भाव जास्तीचा देऊ. शेतक-यांनी आपला ऊस इतर कारखान्याला न देता आपल्या दोन्ही कारखान्याला ऊस देऊन सहकार्य करावे. मी शेतक-यांना आर्थिक बाजुने बळकट केल्या शिवाय स्वथ बसनार नाही असे एमव्हीके कुसूमनगर वाघलवाडा चेअरमन मारोतराव कवळे गुरूजी यांनी प्रतिपादन केले.
उमरी तालुक्यातील एमव्हीके साखर कारखाना कुसूमनगर वाघलवाडा यांचा दशरा दिवशी सिंहलोकन निमित्त प्रथम गळीत हंगाम शुभारंभ या कारखान्याचे चेअरमन मारोतराव कवळे गुरूजी व महंत संतोष पुरी चोळाखेकर,बापुसाहेब कौडगावकर,परमेश्वर पाटिल कवळे, संदिप पाटिल कवळे, प्रभाकरराव पुयेड, गणेशराव पाटिल ढोलउमरीकर, साहित्यिक दिगंबर कदम, गणपतराव पाटिल हस्सेकर, बालासाहेब सावंत सरपंच ,पाडुरंग पाटिल, मोहनराव पाटिल कार्लेकर, परमेश्वर पाटिल कुदळेकर, गणेशराव पाटिल कवळे, लक्ष्मणराव पाटिल शिंदे ,लक्ष्मणराव सावंत,मधुकर बोळसेकर, अनिल वडजे, दत्ताहरी पाटिल हिवराळे, प्रल्हाद हिवराळे तानाजी पाटिल,एमडी एस.जी.अंबटवार, चिफ इंजिनियर बालाजीराव येंडाळे, सचीव नागनाथ पाचांळ,शेतकरी आधिकारी श्री पवार,श्री. स्वामी,शेख रफिक, श्री.शिंदे आधीसह मोठया संख्येने शेतकरी व सर्व कर्मचारी उपस्थितीत होते.
पुढे बोलताना कवळे गुरूजी म्हणाले पुढच्या वर्षी आपण या साखर कारखाना द्रवारे मळी पासुन इथेनॉल व विज निर्मिती चे प्रोजेक्ट झाले तर अजुन शेतक-यांच्या ऊसाला भाव जास्तीचा पुढच्या वर्षी देऊ शेतक-यांनी नियोजन बंद ऊस शेतक-यांनी लागवड करावे असे आहावान केले.
यावेळी महंत चोळाखेकर, दिगंबर कदम करकाळेकर, प्रभाकरराव पुयेड, लक्ष्मणराव पाटिल शिंदे, आधीने विचार मांडले तर प्रस्ताविक चिफ इंजिनियर बालाजीराव येंडाळे यांनी तर सुञसंचलन व आभार आनंद चव्हाण यांनी केले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा