बंदुकीचा धाक दाखवून मुदखेड मध्ये सिनेस्टाईल चोरीचा प्रयत्न.
मुदखेड : शनिवार,दि.३१ ऑक्टोबर रोजी रात्री १०:०० वाजताच्या सुमारास ३ दरोडेखोर दुचाकीवरून सुभाष गंज मोढा परिसरात शिरले होते व त्यांनी प्रसाद ज्वेलर्सचे मालक विपिन पवितवार दुकान बंद करून सोन्या-चांदीच्या दागिन्यांची आणि पैशांची बॅग सोबत घेऊन दुकानाबाहेर आले असता त्या दरोडेखोरांनी विपिन पवितवार या सराफास बंदुक दाखवून त्यांच्याकडील बॅग हिसकावण्याच्या प्रयत्न केला.यावेळी झालेल्या झटापटीत दरोडेखोरांनी विपिन यांना खाली पाडले.त्यानंतर खंजीर आणि बंदूक दाखवत मारहाण केली. त्यावेळी आजूबाजूच्या दुकानदारांनी विपिन यांना कोणीतरी मारहाण करत असल्याचे पाहिले.त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यामुळे विपिन यांना सोडून दरोडेखोरांनी मोटरसायकलने पळ काढला.ते कालेजी देवी रोडवरून पसार झाले 6आहेत.शेजारचे दुकानदार आल्याने विपिन यांना लुटण्याचा दरोडेखोरांचा प्रयत्न अपयशी ठरला आहे.
मुदखेड शहरात बंदुकीचा धाक दाखवत ज्वेलर्सला लुटण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेत झालेल्या झटापटीत विपिन यांना दरोडेखोरांनी मारहाण केल्यामुळे ते जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी मुदखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र,त्यांना जास्त दुखापत झाली असल्याने पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.नि.सुरेश भाले, पोलीस कर्मचारी ठाकुर,पांचाळ,शिंदे,कानकुले,शेख, लोहाळे, यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे.पोलिसांनी घटनास्थळाहून बंदुकीची मॅक्झिम जप्त केली आहे.पोलीस दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासत दरोडेखोरांचा माग काढण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरु आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा