रविंद्र गायकवाड यांची भाजपाच्या उमरी शहर सरचिटणीस पदी निवड.
उमरी:- दि. 12/11/2020 रोजी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची दुपारी 4:30 वाजता मार्केट कमिटी उमरी येथे बैठक घेण्यात आली असून सामाजिक कार्यकर्ते किशनदादा गायकवाड कुदळेकर यांचे थोरले चिरंजीव रविंद्र गायकवाड कुदळेकर भाजपाचे सक्रिय सदस्य यांचे पक्षातील आजपर्यंतचे योगदान व उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन पक्ष श्रेष्ठींनी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या उमरी शहर सरचिटणीस पदी निवड करण्यात आली असून खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी त्यांचे पुष्पहार घालून नियुक्ती पत्र दिले आहे.
भाजपाच्या शहर सरचिटणीस पदी रविंद्र गायकवाड यांची निवड झाल्याबद्दल माजी आ.बापूसाहेब गोरठेकर, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस तथा उमरी तालुका प्रभारी श्रावण पाटील भिलवंडे, गणेश गाढे, शहराध्यक्ष विष्णू पंडित, रावसाहेब पाटील कुदळेकर, किशनदादा गायकवाड कुदळेकर, हनुमंत जाधव कुदळेकर, नामदेव पाटील कुदळेकर, प्रेमलता अग्रवाल, अनिता अनंतवार, राजू पाटील बोळसेकर, सुधाकर देशमुख, बालाजी ढगे, अमोल ढगे, मारोती मनुरकर, पि.एन. धसाडे, अमित पटकुटवार, राजेंद्र किशनराव गायकवाड, सचिन प्रल्हाद गायकवाड, ओम प्रकाश गायकवाड, सतीश बालाजी गायकवाड इत्यादीनी रविंद्र गायकवाड यांचे अभिनंदन केले असून खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा दिले आहेत व त्यांच्या निवड झाल्याचे कळताच मित्र परिवाराकडून अभिनंदन करण्यात येत आहेत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा