इतर साखर कारखान्या पेक्षा उसाला जास्त भाव मिळवून देऊ मारोतराव को कवळे गुरुजी ळी
नांदेड:- उमरी तालुक्यातील वाघलवाडा येथे साखर पुजन कार्यक्रम.ऊस उत्पादक शेतक-यांसाठी व्हीपीके उद्योग समूहाच्या वतीने शेतीच्या आसपास नाला असेल तो नाला खोलीकरण व सरळीकरण करुन घेण्यासाठी व तसेच तळ्यातील गाळ ऊपसा करुन शेतात गाळ टाकण्यासाठी आम्ही जेसीबी मशीन उपलब्ध करुन देऊ. यांचा फायदा शेतक-यांनी घावा तसेच त्या मशनरीला लागेल तेवढे तेवढा डिझेल खर्च स्वता शेतक-यांनी करुन घ्यावे. आम्ही गेल्या वर्षी ऊसाला २५०० रुपये प्रति टन भाव दिला.याही वर्षी ऊसाला इतर साखर कारखाना पेक्षा जास्तीचा भाव देऊ.असे उपस्थित शेतक-यांना एमव्हीके व व्हीपीके कारखान्याचे चेअरमन मारोतराव कवळे गुरूजी यांनी वाघलवाडा साखर कारखान्याच्या साखर पुजनाच्या वेळी प्रतिपादन केले. या वेळी एमव्हीके कुसूमनगर साखर कारखाना वाघलवाडा येथील सोमवारी ता १६ रोजी साखर गाळपाचे पुजन जावाई प्रशांत पाटिल ढोणे व चेअरमन मारोतराव कवळे गुरूजी आदीच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चेअरमन मारोतराव कवळे गुरूजी, संचालक संदिप पाटिल कवळे, परमेश्वर पाटिल कवळे, प्रभाकरराव पुयेड, सरपंच सुहागन पाटिल भोसले, सुभाषराव भोसले, बालाजीराव देशमुख, लक्ष्मण पाटिल हरेगावकर, तानाजी पाटिल हरेगावकर, कारखान्याचे एमडी एस.जी.अंबटवार, चिफ इंजिनियर बालाजीराव येंडाळे, एस.डी.मुळे, एच.ए.तरटे, नारायण पाटील, आनंदराव पाटील भायेगावकर, मधुकर पाटिल बोळसेकर, नाना पाटील बोळसेकर, गोविंद ढगे, प्रल्हाद हिवराळे आदीसह मोठया प्रमाणात ऊस उत्पादक शेतकरी मोठया प्रमाणात उपस्थित होते. पुढे बोलताना कवळे गुरूजी म्हणाले माझे विरोधक जरी शेतक-यांना आपला ऊस कवळे गुरूजी च्या साखर कारखाना देऊ नका जरी म्हणत असतील ते त्यांनी विरोध म्हणून राजकारण करीत आहेत.या अशा राजकारणा मुळे शेतक-यांचे नुकसान आहे.शेतक-यांनी स्वताचे नुकसान करुन घेऊ नका. कारण माझ्या कडे जो शेतक-यांनी ऊस दिला तर भाव वाढुन मिळणार आहे. मी गेल्या वर्षी २५०० रुपये प्रति टन भाव दिलोत. याही वर्षी इतर साखर कारखाना पेक्षा जास्तीचे भाव शेतक-यांच्या ऊसाला देऊ म्हणून माझ्या कडे जर शेतक-यांनी ऊस दिला तर प्रति टना माघे ३०० रुपये भाव वाढ आहे.इतर साखर कारखान्याकडे ऊस शेतक-यांनी दिलात तर तो कारखाना २२०० रुपयाने प्रति टन भाव देतो .मग का शेतक-यांनी 300 रुपये भाव कमी करुन स्वताचे नुकसान घेत आहात. तर शेतक-यांनी स्वताचा फायदा स्वता करुन घ्यावे.इतराचे ऐकुन आपले नुकसान करुन घेऊ नका असे कवळे गुरूजी शेतक-यांना आहावान केले आहे.सुञसंचलन व आभार प्रल्हाद हिवराळे यांनी मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा