महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून कवळे गुरूजींना वाटेल ती मदत करु...माजीमंञी डी.पी.सावंत.
उमरी ता.४ बातमीदार
राज्याचे माजी तञशिक्षण मंञी डि.पी.सावंत यांनी सिंधी येथील व्हीपीके उद्योग समुहाला भेट देऊन साईकृपा दुध डेरी व गाईम्हशी गोठा, गुळपावडर कारखाना व व्यंकटराव पाटिल कवळे पतसंस्थाच्या शाखेला भेट देऊन पाहणी करत असताना स्वता डि.पी.सावंत भाराऊन गेले.कवळे गुरूजी चे उद्योग म्हणजे सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या हाताला रोजगार, शेतीला जोड व्यवसाय म्हणजे दुग्ध व्यवसाय,पतसंस्था म्हणजे छोटे व मोठे व्यवसाईक ,बचत गट असेल,शेतकरी असेल यांना अल्प दरात कर्जे पुरवठा करुन सर्वांना मदत करुन त्यांची आर्थिक बाजु बळकट करुन पुढे घेऊन जाण्याचे काम कवळे गुरूजी करत असल्याचे पाहून माजी मंत्री डि.पी.सावंत बोलतांना म्हणाले राज्याच्या महाविकास आघाडीच्या सरकार मध्ये आपल्या सर्वाचे नेते माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंञी तथा नांदेड जिल्हा चे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे पाठबंळ आहे. मी स्वता सोबत आहे.कवळे गुरूजी तुम्ही कामे करत राहा आम्ही तुम्हाला आर्थिक पाठबळ उभे करु असे डि.पी.सावंत म्हणाले.
यावेळी नांदेडचे माजी उपमहापोर आनद पाटिल चव्हाण,चद्रकांत गव्हाणे,संदिप पाटील,परमेश्वर पाटील,चिफ इंजिनिअर जाधव साहेब,..आधी उपस्थितीत होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा