परभणी जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस ग्रंथालय विभागाची आढावा बैठक परभणी जिल्हा प्रभारी श्री संतोष दगडगावकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभागाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री उमेशदादा पाटील यांच्या सूचनेनुसार परभणी येथे राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभाग जिल्हाध्यक्ष प्रभू नारायण उरडवड आयोजित ग्रंथालय विभाग आढावा बैठक दिनांक 6/11/2020 रोजी दुपारी 2 वाजता परभणी जिल्हा प्रभारी सन्माननीय श्री संतोष दगडगावकर यांच्या अध्यक्षतेखाली "राष्ट्रवादी भवन परभणी येथे पार पडली.कार्यक्रमाची सुरुवात प्रभू नारायण उरडवड
यांच्या प्रस्तावनेने केली. प्रभाग तेथे ग्रंथालय, ग्रंथालय चळवळ आणि त्याचा सर्वसामान्य जनतेला होणार फायदा, ग्रंथालय अनुदान वाढ,अनुदान दुप्पट,दर्जावाढ,नवीन ग्रंथालयाचे प्रस्ताव, प्रत्येक पदाधिकारी यांचे ग्रंथालय असावे असे अनेक मुद्दे मांडले गेले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यूवकचे जिल्हा अध्यक्ष रितेश काळे व तथा किरण तळेकर उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथलय विभाग परभणी जिल्हा
महिला उपाध्यक्षा सौ. रेखाताई आवटे व परभणी जिल्हा कार्याध्यक्ष शंकर ठाकूरसर व परभणी तालुका अध्यक्ष आशाताई काबळे परभणी जिल्हा उपाध्यक्ष, गंगाधर सातेगावकर
पूर्णा तालुका अध्यक्ष उद्धव सवराते व योगेश पाटील आणि संतोष भंडारे माधव वाघमारे मारुती सोनटक्के प्रसाद नरवडे शिवसाब सोनटक्के बाबुराव सोनटक्के
चंद्रकांत सातोरे रमेश जमराज टोपाजी धुतराज ग्रंथालय विभाग चे सर्व कार्यकारणी सदस्य व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा