उद्योजक मारोतराव कवळे गुरूजी यांच्या वाढदिवसा निमित्त एक जानेवारी रोजी उमरीत रक्तदान शिबिराचे आयोजन
उमरी.ता.२८ बातमीदार नांदेड जिल्हातील एमव्हीके व व्हीपीके उद्योग समुहाचे चेअरमन मारोतराव कवळे गुरूजी यांचा एक जानेवारी रोजी वाढदिवस आहे.या वाढदिवसा निमित्त एमव्हीके साखर कारखाना कुसूमनगर वाघलवाडा येथे रक्तदान तसेच प्रयागनगर सिंधी येथील व्हीपीके गुळपावडर कारखाना आणी उमरी मौढा मैदान येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले तसेच उमरी ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप व सामाजिक बांधिलकी जोपासत गरजुना बॅल्याॅकेट वाटप होणार असल्याचे माहिती कवळे गुरूजी मिञमंडळाच्या वतीने देण्यात आले. एक जानेवारी रोजी उद्योजक मारोतराव कवळे गुरूजी यांनी सकाळी सात वाजता संत दासगणु महाराज समाधी गोरठा येथे दर्शन होईल.७.३० वाजता हनुमान गड मारोती मंदिर दर्शन, सकाळी आठ वाजता जुन्नी उमरी येथील बाबा महाराज समाधी मंदिर दर्शन, ८.३० वाजता सकाळी साईबाबा मंदिर दर्शन,सकाळी नऊ वाजता पञकार नरेंद्र येरावार यांच्या निवासस्थानी सन्मान सोहळा, ९.३० वाजता जेष्ठ व्यापारी तथा डिआरयुसी रेल्वे सदस्य पारसमल दर्डा यांच्या निवासस्थानी सत्कार सोहळा,...