नायगाव दि 24- नांदेड नायगाव रस्त्यावर धावणाऱ्या आयचर टेम्पो चा सिनेस्टाईल मोटार सायकलने पाठलाग लुटारूंच्या टोळीने पाठलाग केला व टेम्पो अडवला,कॅबिन मध्ये जबरदस्तीने घुसून चालक व वाचकाला तलवारीचा धाक दाखवुन नगदी रक्कम 4,95,000/- (अक्षरी – चार लाख पंचाण्णव हजार) रुपये बळजबरीने हिसकावुन घेवुन हे लुटारू पळाले होते,या आरोपीतांना कुंटुर पोलिसांनी केवळ 36 तासात मुद्देमालासह अटक केल्याची घटना घडली आहे. या धाडसी कृत्याबद्दल कुंटुर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या बाबत अधिक वृत्त असे की फिर्यादी शेख असीफ अली शेख मुनवर अली वय 33 वर्ष व्यवसाय – अंडा व्यापारी (अली अॅग्रो फार्मिंग सिध्दीपेठ) रा.12-1-58 गणेश नगर सिध्दीपेठ ता. जि.सिध्दीपेठ राज्य – तेलगंणा यांच्या कंपनीतील आयचर टेम्पो क्र.TS-16 -UC-2343 चे ड्रायव्हर मिझा अफझल बेग व महमद जमील हे दोघेजण अकोला येथे अंडे विक्री करुन सिद्धीपेठH कडे परत येत होते, विक्री केलेल्या अंडयाची रक्कम 4,95,000/- (अक्षरी चार लाख पंचाण्णव हजार) रुपये त्यांच्याजवळ होती, नांदेड ते नायगांव टप्प्यात मौ.देगाव फाटा येथे दि.15/12/2020 रोजी सकाळी अंदाजे वेळ 04.10 वाजता टेम्पो धावत असतांना अज्ञात तिन इसमांनी मोटार सायकल वर पाठलाग केला, टेम्पो थांबवुन ते कॅबिन मध्ये घुसले,तलवारीचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी दिली.व क्लिनर साईडच्या पाठीमागील सिट खाली ठेवलेली रक्कम जबरीने काढून घेतली, धाक दाखवण्याच्या हेतूने आयचर टेम्पोच्या काचा तलवारीने फोडल्या व पळून गेले,
पोलिसांकडे आलेल्या फिर्यादीवरून कुंटुर पो.स्टेला गु.र.नं. 213/2020 कलम 392,427,506, 34 भा.दं.वि. सह कलम 4/25 भारतीय हत्यार कायदा 1959 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला .
हा गुन्हा दाखल होताच गुन्हयाचे तपासीक अधिकारी, के.एस.पठाण, सहाय्यक पोलीस निरिक्षक, पोलीस स्टेशन कुंटुर यांनी प्रमोद शेवाळे, पोलीस अधिक्षक नांदेड, निलेश मोरे, अपर पोलीस अधिक्षक नांदेड, डॉ.सिध्देश्वर धुमाळ, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग बिलोली, द्वारकादास चिखलीकर, पोलीस निरिक्षक, स्थानिक गुन्हे शाखा नादेड यांचे मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरवली गुन्हयातील अज्ञात आरोपीतांनी केलेल्या गुन्हयाच्या पध्दतीचा अभ्यास केला आरोपीतांची शोध मोहीम जोरात चालवली.
आरोपी नामे 1) शेख जैनुद्दीन शेख दस्तगीर वय 32 वर्ष व्यवसाय – ड्रायव्हर रा.साई नगर, इतवारा नांदेड ता.जि.नांदेड 2) शेख जफर शेख जमील वय 25 वर्ष व्यवसाय – व्यापार रा.साने हॉस्पीटल जवळ, झाकीर हुसैन नगर परभणी ता. जि.परभणी 3) अकबर वलीयोद्दीन इनामदार वय 26 वर्ष व्यवसाय – क्लिनर रा.दर्गा रोड, एक मिनार मस्जीद परभणी ता.जि.परभणी हे या शोध मोहिमे दरम्यान हाती लागल्यानंतर त्यांना ताब्यात घेवुन पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणला व सदर गुन्हयातील आरोपीतांकडुन गुन्हयातील चोरलेला माल रक्कम 4,74,300/- (अक्षरी चार लाख चौन्याहत्तर हजार तिनशे ) रुपये व गुन्हयात आरोपीतांनी वापरलेली तलवार, मोटार सायकल क्र.MH-22-AR-7776 आदी ऐवज त्यांचे राहते घरुन जप्त करुन पुराव्यासह गुन्हयात आरोपीतांना अटक करण्यात आली आहे.
सदरची यशस्वी कार्यवाही के.एस.पठाण,सहाय्यक पोलीस निरिक्षक, पोलीस स्टेशन कुंटूर यांचे सोबत पोना/94 शेख अब्दुल बारी, पोकॉ/2378 शंकर बुध्देवाड पोकॉ/2668 अशोक घुमे, व
1874 विवेक ईश्वर , पोकॉ/2550 अभिजीत पाटील यांनी पार पाडली आहे.पोलिसांच्या या तडाखेबंद कामगिरीचे नागरिकांत कौतुक होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सर्वाधिक एमबीबीएस सिलेक्शन देण्यात आयआयबी ठरणार महाराष्ट्रात अव्वल

भावी डॉक्टरांसाठी ११ डिसेंबर रोजी "IIB महा FAST"