एका जुगार अड्यावर शस्त्रांच्या धाकावर झाली लाखो रुपयांची लुट

नांदेड,- नांदेड पोलीसांनी अनेक गुन्हेगारांना गजाआड केले आहे. याचा कांही एक प्रश्न नाही. पण गुन्हेगारी संपली नाही. शहरातील नदीकाठी चालणाऱ्या एका “उल्ला’ या नावाच्या माणसाद्वारे चालवला जाणारा जुगार अड्डा लुटण्यात आला. जुगाऱ्यांना लुटले याचाही कांही रोष होवू शकत नाही. पण या भागातील सर्वसामान्य नागरीकांना सुध्दा दहशतीखाली जगावे लागत आहे. कारण लुट करणाऱ्यांकडे बंदुका होत्या. याचा शोध पोलीस घेतील की नाही हे माहित नाही पण असा भयंकर प्रकार 17 सप्टेंबरच्या रात्री 3 वाजेच्यादरम्यान गोदावरी नदी काठी घडला आहे.
अत्यंत खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 17 सप्टेंबर रोजी शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीकाठी वसलेल्या एका नगरात एक जुगार अड्डा चालतो. या जुगार अड्‌ड्याची माहिती पोलीस विभागाला होती की नाही याबद्दल कांही एक सांगता येणार नाही. पण सुत्र सांगतात पोलीसांना सुध्दा या जुगार अड्‌ड्याची माहिती नाही. या दिवशी या जुगार अड्‌ड्यात जबर लुट झाली. 17 सप्टेंबरच्या रात्री 3 वाजेच्यासुमारास या ठिकाणी दुचाकीवर आलेले अनेक दरोडेखोर आत शिरले त्यांची संंख्या 13 ते 14 असेल असे सांगण्यात आले. प्रत्येकाकडे घातक असलेले पिस्तुल आणि तिक्ष्ण हत्यारेपण होती. दरोडेखोरांनी जुगार अड्‌ड्यात शिरताच अनेकांना जबर मार दिला. त्यात जवळपास 20 ते 22 लोक जखमी आहेत अशी माहिती सांगण्यात आली. जुगार अड्‌ड्यामध्ये ज्यांच्याकडे पैसे जास्त प्रमाणात असतात अशांनाच दरोडेखोरांनी बंदुकी कानशिळावर ठेवून पैशांची लुट केली. सुत्रांनी सांगितले की, 7 ते 8 लाख रुपयांची लुट झाली असेल.
दरोडेखोर एवढ्यावरच थांबले नाहीत. तर कायदेशीर दृष्ट्या रात्री रेतीची वाहतूक बेकायदेशीर असतांना रेतीची वाहतूक करणाऱ्या अनेकांना मारहाण केली. सोबतच या भागात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरीकांना सुध्दा या दरोडेखोरांनी चोप दिला. सोबतच या भागात निर्माण केलेली दहशत आजही कायम असल्याचे दिसते. जुगार अड्डा चालवणाऱ्या उल्लाने पोलीसांकडे मदत मागितली की, नाही याबाबत कांही माहिती प्राप्त झाली नाही. जुगार अड्डा चालकपण नंबर 2 चेच काम करतो आहे म्हणून बहुदा त्याने तक्रार दिली नसेल. पण त्या ठिकाणी रात्री 3 वाजता गोड झोपेत असणाऱ्या सर्वसामान्य नागरीकांवर झालेल्या हल्याची दखल पोलीस प्रशासनाने घेणे अत्यंत आवश्यक आहे अशी चर्चा सुरू आहे.
जुगार अड्डा लुटला गेला तेंव्हा त्यात अनेक अशा मंडळी होत्या ज्या कोणी अमुक माणसाने मला 50 लाख रुपये मागितले, मी तर गरीब आहे, एवढे पैसे असल्यानंतर मी जुगार अड्‌ड्याचे काम का केले असते असे सांगत होते. त्यांनी एका दरोडेखोराला झटका देवून तेथून पळ काढला अशीही खात्रीलायक माहिती आहे. दोन नंबरचे काम करण्यासाठी रक्तात दम असावा लागतो असे व्हिडीओ व्हायरल करणारे हे गृहस्थ पळून गेले. उपलब्ध माहिती आधारे दरोडेखोरांनी केलेली लुट या पेक्षा सर्वसामान्य माणसाला या 40 ते 45 मिनिटात झालेला त्रास दखल योग्य आहे. यासाठीच हा प्रपंच

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सासऱ्याला मारणाऱ्या क्लास वन अधिकारी सुनेबद्दल धक्कादायक माहिती समोर, नागपूर पोलिसांची मोठी कारवाई

मनूर खून प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करा-महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेची मागणी

उमरी तालुक्यातील मनरेगा कामात कौट्यावधी चा भ्रष्टाचार मुख्याधिकारी यांच्या कार्यवाही कडे तालुक्याचे लक्ष