उमरी तालुक्यातील चुकीची आणेवारी दुरुस्ती करून संबंधित आणेवारी ठरवणाऱ्या अधिकारी यांच्यावर कार्यवाही करावी -छत्रपती युवासेना

उमरी;महसूल प्रशासनाने उमरी तालुक्यातील सतत पावसाने व पुर परिस्थिती असताना शेतकऱ्यांच्या हातात आलेले सोयाबीन, कापूस, उडीद,मुग अनेक पिक अतिवृष्टीमुळे वाहुन गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.येवढी नुकसानदायक परिस्थिती असताना महसूल प्रशासनाने चुकीची 62 टक्के पैसेवारी काढून शेतकर्यांची चेष्टा केली आहे तरी जिल्हाधिकाऱ्यांनी चुकीच्या नजर आणेवारी मध्ये वस्तू निसट दुरूस्ती करण्याच्या सुचना संबंधित अधिकाऱ्यांना द्याव्यात त्याच प्रमाणे चुकीच्या काढण्यात आलेल्या आनेवारीशी संबंधित अधिकाऱ्यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी उमरी छत्रपती युवा सेना संघटनेच्या वतीने नायब तहसीलदार उमरी यांना
छ.यु.से.जिल्हा प्रमुख अॅन्ड संभाजी नरवाडे साहेब यांच्या आदेशानुसार निवेदन आला.
गेल्या चार वर्षापूर्वी अधिकारी यांच्या चुकीमुळे तालुक्यातील शेतकरी यांना त्यावेळेसच्या नुकसानीचा मोबदला मिळाला नव्हता या खरीप हंगामा मध्ये दोन ते तीन वेळा अतिवृष्टी झाली तसेच गोदावरी नदीला पुर आल्यामुळे गोदाकाठच्या गावासह अनेक गावातील सर्व पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले असे असताना ६२ टक्के आणेवारी काढणे म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा आहे तरी आणेवारीत त्वरित दुरुस्ती करुन शेतकरी यांना न्याय द्यावा अशी मागणी करून नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आला.
याप्रसंगी,ओबिसी सेलचे जिल्हाध्यक्ष रईसखान पठाण,तालुकाध्यक्ष उद्धव मामडे रावधानोरकर, युवाअध्यक्ष तेजेराव शिंदे,सामाजिक न्याय तालुकाध्यक्ष साहेबराव झुंजारे,
ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष आरीफ शेख,सरचिटणीस सचिन खंडेलोटे,साईनाथ पाटील मोरे चिंचाळकर,गौतम मिसाळ यांच्यासह अनेक छत्रपती युवा सेनेचे सदस्य उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सर्वाधिक एमबीबीएस सिलेक्शन देण्यात आयआयबी ठरणार महाराष्ट्रात अव्वल

भावी डॉक्टरांसाठी ११ डिसेंबर रोजी "IIB महा FAST"