ह्या ८२वर्षाच्या तरुण लढवय्या व्यक्तिमत्वास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा .
विद्यापीठ निर्मिती आणि विकासासाठी आग्रही असणारे मला भावलेले मा. शरद पवार साहेब.
महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणात नेहमीच आपली घट्ट पकड ठेऊन देशातील शेती ,शिक्षण ,कला , साहित्य ,क्रीडा ई.क्षेत्रात अत्यन्त सुष्म बारकावे लक्षात घेऊन सर्वांच्या हिताचा निर्णय घेणारे पदमविभूषण मा.शरदचंद्र पवार साहेब ह्यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमीत्य त्यांना हार्दिक शुभेच्छा.
मा. साहेबांना २०१७ रोजी मराठवाडयातील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने मानद डी.लिट .पदवी प्रदान करून त्यांचा सन्मान केला.
ह्या पदवी प्रदान समारंभ प्रसंगीच्या काही गोष्टी मला खूप भारावून गेल्या. मी राष्ट्रीय सेवा योजना मध्ये कार्यक्रम अधिकारी म्हणून काम करत असताना मी व माझे सर्व स्वयं सेवक आम्ही तिथे उपस्थित होतो.साहेब वेळेला खूप महत्व देतात हे मला आधीच माहित होते पण ते प्रत्क्षात देखील पहिले . समारंभाच्या खूप वेळोअगोदर ते विद्यापीठात पोहचले .मा.कुलपती तथा महामहिम राज्यपाल चे. विद्यासागर राव ह्यांचे आगमन झाल्याबरोबर समारंभास सुरवात झाली. ऐरवी विध्यार्थी आणि त्यांच्या पालकांची गर्दी पदवी प्रदान समारंभास पाहावयाला मिळते पण त्या दिवशी खूप जास्त लोक मा. साहेबांना पदवी प्रदान होते आहे ह्या साठी आले होते.कार्यक्रम सुरु झाला मुलांना पदवी प्रदान करण्यासाठी सर्व अधिष्ठाता ह्यांनी मा.कुलपती ह्यां विनंती केली. गोंगाट चालूच होता त्यानंतर मा. कुलपती महोदयांनी मा. शरद पवार साहेबांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ च्या वतीने मानद डी.लिट पदवी प्रदान करून त्यांचा सन्मान केला.ह्या नंतर पदवी प्रदान सोहळ्यासाठी आलेल्या मा. शरद पवार साहेब ह्यांना दीक्षांत भाषण द्यावे ह्या साठी विनंती करण्यात आली.सगळं दीक्षांत परिसर शांत झाला , साधि राहणी पण प्रचंड आत्मविश्वासा सोबत दांडगा राजकीय अनुभव आणि त्यांची अलौकिक वक्तृत्व शैली असणारे साहेब काय बोलणार ह्या बदल प्रत्येक जण उत्सुक होते.त्यांनी अतिशय प्रेमळ मानाने हा त्यांचा केलेला सन्मान स्वीकारला .
मा.साहेबांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ह्याच्या निर्मिती पासून त्यांचे अनुभव सांगितले.त्या नंतर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ साठी ५० लाख रुपयांची मदत जाहीर केली .त्या मध्ये विध्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी ह्यासाठी आपले मत मांडले .हि शिष्यवृत्ती कोणाच्या नावे द्यावी ह्यांचा पण उल्लेख त्यांनी केला. त्या नंतर साहेब म्हणाले कि "ह्या मदती मध्ये कधीहि शरद पवार आणि त्यांच्या ट्रस्ट चे नाव कधी येता काम नये",असा उल्लेख केला .सर्व दीक्षांत परिसरात टाळ्या चा गडगड झाला अप्रतिम शांतता असताना साहेबांनी विद्यापीठ च्या विकासासाठी काय केले जावे ह्या वर सखोल मत मांडले. सर्व तरुण मंडळी साहेबांची फॅन का आहे हे मला तेंव्हाच समजलं .नांदेड ,मराठवाडा ,मधील लोकांची सध्याची शैक्षणिक ,आर्थिक सामाजिक परिस्थिती साहेबांना किती जवळून माहित आहे ह्याचा मला प्रत्यय आला.समारंभ संपल्यानंतर हि साहेब त्यांच्या प्रत्येक शुभचिंतकांना ,कार्यकर्त्यांना ,पदाधिकार्यांना संवाद सादत होते.Z+ सुरक्षा असून प्रत्येकाला भेटीच्या तळमळ आम्ही जवळून पहिली .राष्ट्रीय सेवा योजना च्या स्वयं सेवक चा आग्रह होता म्हणून फोटो सुद्धा घेतला .त्यांनी कोणालाच नाराज केले नाही. तिथला एक पत्रकार मित्र तेंव्हा म्हणाला कि आज मा. शरद पवार साहेबांनी नांदेड कारण एक वेगळीच मदत दिली आहे ज्याचा उपयोग इथे शिकणाऱ्या प्रत्येकाला होईल.
ह्या ८२वर्षाच्या तरुण लढवय्या व्यक्तिमत्वास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा .
- शब्दांकन
प्रा. अमन भि.कांबळे
९४२००१६३४६
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा