उमरी तालुक्यातील ३८ गावांचे ड्रोनद्वारे सर्वे करून पी.आर कार्ड तयार होणार

    भूमि अभिलेख नांदेड च्या वतीने उमरी तालुक्यातील ३८ गावांचे ड्रोनद्वारे सिटी सर्वेक्षण जी.आय.एस प्रणाली द्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे आज उमरी तालुक्यातील ३८ गावातील घरांचे कुठलेच अभिलेख उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे पी.आर कार्ड मिळकत पत्रिका तयार करण्याचे  भुमी अभिलेख विभागाने काम हाती घेतले आहे.आज मौजे बोळसा बु येथील गावठाण क्षेत्राचे चुना व पेंट द्वारे खुणा कायम करुन ड्रोन द्वारे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले.असून त्यांना पुढील टप्प्यात प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार आहे.
भूमि अभिलेख विभागाच्या वतीने आज मौजे बोळसा बु येथे गावठाण ड्रोन सर्वे या कामाचे उद्घाटन करुन कामास सुरुवात करण्यात आली यावेळी उमरी तालुका भुमी अभिलेख कार्यालयाकडून उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती भुमी अभिलेख नांदेड जिल्हा अधीक्षक सौ. एस.पी.शेट्टीया मॅडम, उमरी तहसील कार्यालयाचे तहसीलदार मा. माधवराव बोथीकर साहेब, भुमी अभिलेख उमरीचे उपाधिक्षक मा.निलेश उंडे साहेब, मा.पिंपळगावकर, मा.डाके साहेब,मा.मुनलोड साहेब, मा. अनिल दासरे,मा.सरपंच माधवराव निरदोडे, मा.उपसरपंच गणपतराव पाटील मरोळे, पोलिस पाटील संजय बाबुराव चिकटवाड, ग्रामसेवक बाबुराव तोटेवाड साहेब,मा.पाटील सर,मा.सरपंच मोतीराम चिकटवाड, ज्ञानेश्वर दारसेवाड बोळसेकर यांच्या सह गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सर्वाधिक एमबीबीएस सिलेक्शन देण्यात आयआयबी ठरणार महाराष्ट्रात अव्वल

भावी डॉक्टरांसाठी ११ डिसेंबर रोजी "IIB महा FAST"