निकृष्ठ दर्जाचे व लायसन्स नसताना ISI क्रमांक टाकून पी व्ही सी पाईप विक्री केल्या बद्दल " सुप्रीम गोल्ड"कंपनीवर गुन्हा नोंदवावा मागणी...(आप नांदेड)

किवळा येथील शेतकरी अवधूत संभाजीराव पवार यांनी सुप्रीम गोल्ड गुंडेगाव येथील कंपनी कडून 2 इंची 30  नग पी व्ही सि पाईप खरेदी केले होते सदर पाईप एका महिन्यात दोन वेळा तडकून फुटले व शेतकऱ्याचे हळद, अद्रक,चिकू, लिंबोनी फलबागेचे जवळपास 2 ते 3 लाख रुपयांचे नुकसान झाले .सदर शेतकऱ्याने ISI कंपनीला पाईपचा दर्जा तपासावा व निकृष्ट दर्जा असेल तर कळवावे असा अर्ज केला. परंतु ISI कंपनीने सुप्रीम च्या प्रतिनिधी ने शेतावर भेट दिली परंतु पाईप सॅम्पल नेऊन सुद्धा पाईपचा दर्जा तपासला नाही व फुटलेल्या चार पाईपचा किंमत 5000रु शेतकऱ्यांना दयावे असे आदेशीत केले. म्हणून शेतकऱ्यांने सुप्रीम गोल्ड कंपनी वर फसवणुकीचा गुन्हा नोंद करावा असा रीतसर अर्ज पोलीस स्टेशन सोनखेड येथे दिला .परंतु सोनखेड पोलासानी सुद्धा गेल्या 3/ 4 महिन्यात समाधानकारक तपास केला नसल्याने आज आम आदमी पार्टी नांदेड समिती ने सोनखेड API विशाल भोसले यांची भेट घेऊन निवेदन दिले . जर सात दिवसात सुप्रीम गोल्ड कंपनी वर गुन्हा नाही केला तर आम आदमी पार्टी आंदोलन करील असा इशारा देण्यात आला..
    सदर निवेदनावर फाऊंडर मेंबर नरेंद्रसिंघ ग्रंथी,जिल्हा संयोजक ज्ञानेश्वर कदम, सचिव डॉ. अवधुत पवार आणि नांदेड दक्षिण व नांदेड उत्तर विधानसभा प्रमुख अँड. जगजीवन भेदे हे उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सर्वाधिक एमबीबीएस सिलेक्शन देण्यात आयआयबी ठरणार महाराष्ट्रात अव्वल

भावी डॉक्टरांसाठी ११ डिसेंबर रोजी "IIB महा FAST"