लायन्स क्लब नांदेड सेंट्रल व लायन्स क्लब नांदेड अन्नपूर्णा या दोन क्लबच्या पदग्रहण सोहळ्याचा भव्य समारंभ नैवेद्यम हॉलमध्ये संपन्न झाला
लायन्स क्लब नांदेड सेंट्रल व लायन्स क्लब नांदेड अन्नपूर्णा या दोन क्लबच्या पदग्रहण सोहळ्याचा भव्य समारंभ नैवेद्यम हॉलमध्ये संपन्न झाला असून गतवर्षीचे अध्यक्ष धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी नूतनाध्यक्ष शिवकांत शिंदे व अरुणकुमार काबरा यांच्याकडे नवीन वर्षाची सूत्रे सुपुर्द केली. पदग्रहण सोहळ्याचे इन्स्टॉलेशन ऑफिसर ॲड. प्रवीण अग्रवाल , इंडक्शन ऑफिसर शिरीष कासलीवाल , पूर्व प्रांतपाल जयेशभाई ठक्कर,झोन चेअरपर्सन संजय अग्रवाल, अरुण कुमार काबरा, राजेशसिंह ठाकुर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. प्रमुख अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यानंतर सर्वांचा सत्कार करण्यात आला. सविता काबरा यांनी ध्वज संहिता सांगितली. कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप ठाकूर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली . अरुण काबरा यांनी आपला अहवाल सादर केला. शिरीष कासलीवाल यांनी ओमप्रकाश कामीनवार प्रवीण जोशी,अरुण वट्टमवार या नवीन सदस्यांना शपथ दिली. प्रवीण अग्रवाल यांनी मार्गदर्शन करत असताना लायन्स क्लब नांदेड सेंट्रल च्या वतीने घेण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची स्तुती करून न...