अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ व अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जुनी पेन्शन सह शिक्षकांच्या अन्य न्याय्य मागण्यांसाठी ३१ ऑगस्ट पर्यंत राष्ट्रव्यापी स्वाक्षरी मोहीम सुरू

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ व अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जुनी पेन्शन सह शिक्षकांच्या अन्य न्याय्य मागण्यांसाठी ३१ ऑगस्ट पर्यंत राष्ट्रव्यापी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. ही सर्व राज्याची स्वाक्षरी पत्रके एकत्र करून राज्याचे मा.मुख्यमंत्री आणि संपूर्ण देशभरातील स्वाक्षरी पत्रके महामहीम राष्ट्रपती व मा. पंतप्रधान महोदयांना सादर करणार आहेत.  त्याअनुषंगाने आज गटशिक्षणाधिकारी कार्यालय उमरी येथील 9 केंद्रातील शिक्षकांचे समन्वय साधून येणाऱ्या शिक्षण परिषदेत  प्रत्येक केंद्रातील 100% शिक्षकांनी स्वाक्षऱ्या  करण्या संदर्भात शिक्षकांना स्वाक्षरी मोहीम यशस्वी करण्यासंदर्भात माहीती देण्यात आली.
 याप्रसंगी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे नेते सावंत डी.एम.,भोसले एम.आर., जुनी हक्क पेन्शन संघटनेचे नेते शेख अलिम,दशरथ कांबळे व राहुल जोंधळे होते.अखिल संघटनेचे पदाधिकाऱ्यांसह  बालाजी कदम,सतिश राठोड, गजानन कवळे, टेकाळे सर,माळवदकर सर,कदम सर,पेंडलवार सर,कामिणवार सर,सलगरे सर,जोंधळे सर ,चिंताके सर,आचमे मॅडम,उपस्थित होते.
 विविध न्याय्य मागण्यांबाबत स्वाक्षरी मोहीम यशस्वी करावे असे आव्हान अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री.देविदास गोडगे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सासऱ्याला मारणाऱ्या क्लास वन अधिकारी सुनेबद्दल धक्कादायक माहिती समोर, नागपूर पोलिसांची मोठी कारवाई

मनूर खून प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करा-महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेची मागणी

उमरी तालुक्यातील मनरेगा कामात कौट्यावधी चा भ्रष्टाचार मुख्याधिकारी यांच्या कार्यवाही कडे तालुक्याचे लक्ष