नवोदय प्रवेश परिक्षेत नेत्रदीपक यशानंतर जि.प.शाळेचा केला ग्रामपंचायतीने सन्मान...

उमरी.
दि 28/7/2022
आज जिल्हा परिषद प्राथमिक नागठाणा खू. शाळेतील विद्यार्थ्यी कु.वरदा देविदास गोडगे हीने तालुक्यातील प्रथम स्थानावर नवोदय प्रवेश परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल ग्रामपंचायत नागठाणा खु येथील सरपंच सौ.मीनाताई दिगांबर ढेरे व ग्रामसेवक मिलिंद दवणे साहेब यांनी शाळेत येऊन मुख्याध्यापक विरेश स्वामी सर ,दत्ता काळबांडे सर  व देविदास गोडगे सर यांचा सन्मान करित कु.वरदा देविदास गोडगे या बालिकेचे यथोचित अभिनंदन केले.या प्रसंगी बालाजीराव वडजे पाटील यांनी 'केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे..' या उक्ती प्रमाणे मुलांनी आपले अभ्यास रूपी कर्तव्य केले तर निश्चितच यश संपादन करता येते,असे मत प्रकट केले.
कार्यक्रमातून काळबांडे सरांनी विद्यार्थ्यानी कठिण परिश्रमपूर्वक अभ्यासात सातत्य कायम ठेवून असे यश मिळवता येते असे सांगितले .नागठाणा खु. येथील नवोदय परिक्षेतिल यशाची परंपरा कायम ठेवण्यास आम्ही कठीबद्ध  आहोत असे अभिवचन मुख्याध्यापक स्वामी सर ग्रामवासियांना दिले. याप्रसंगी ग्रा.पं.सदस्य व शा.व्य.समिती सदस्य उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सासऱ्याला मारणाऱ्या क्लास वन अधिकारी सुनेबद्दल धक्कादायक माहिती समोर, नागपूर पोलिसांची मोठी कारवाई

मनूर खून प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करा-महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेची मागणी

उमरी तालुक्यातील मनरेगा कामात कौट्यावधी चा भ्रष्टाचार मुख्याधिकारी यांच्या कार्यवाही कडे तालुक्याचे लक्ष