कवळे गुरूजी यांनी नायगाव विधानसभा भागातील शेतक-यांना आर्थिक बाजुने भक्कम केलात ...माजी मंञी डि.पी.सावंत यांचे प्रतिपादन
प्रगतशील शेतकरी नरहरी लक्ष्मण चव्हाण यांनी सहपत्नीक केली बॉयलर पूजा..
उमरी (बातमीदार)
नायगाव विधानसभा मतदार संघात या भागात सिंचनाची सोय असल्या कारणाने शेतक-यांसाठी गुळपावडर व साखर कारखाने उभारून शेतक-यांचे व बेरोजगाराचे भले केलात त्यात व्यापारपेठ वाढुन व्यापाराचे भले केलात.कमी खर्चात विक्रमी ऊसाचे उत्पादन कसे काढले पाहिजे हे भागातील शेतक-यांना समुहाकडुन बांधावर जाऊन माहिती देता.यात शेतकरी हा यांचा फायदा घेत ऊसाचे विक्रमी उत्पादन काढुन आर्थिकबाजुने सक्षम होत आहे.कवळे गुरूजी तुम्ही भागातील शेतकरी आर्थिक बाजुने सक्षम झाला पाहिजे यासाठी अहोरात्र परिश्रम घेत असल्याने तुमचे स्वप्न सत्यात उतरत आहात.
जसे पुर्वी या भागातील शेतकरी आर्थिक बाजुने सुधारला पाहिजे यासाठी वाघलवाडा साखर कारखाना स्वर्गीय शंकरराव चव्हाण व नेते अशोक चव्हाण यांनी हस्सेकर यांच्या माध्यमातून उभारले. हस्सेकर यांच्या निधनाने बंद कारखाना कवळे गुरूजी तुम्ही रितसर विकत घेऊन अवघ्या दोन महिन्यात चालु करुन ऊसाला एफारपी नुसार दर्जेदार भाव देऊन शेतकऱ्यांची दिवाळी साजरी केलात.असे माजीमंञी डि.पी.सावंत यांनी प्रतिपादन केले.
वाघलवाडा साखर कारखान्याच्या ता.१० ऑक्टोबर रोज सोमवारी तिस-या गळीत हंगामच्या बाॅयलर उद्घाटन च्या अध्यक्षीय भाषणातुन माजी मंञी डि.पी.सावंत यांनी प्रतिपादन केले.
कवळे गुरूजी यांनी भागातील शेतक-यांची आर्थिक बाजुने मजबुत करण्यासाठी तुम्ही आहोराञ मेहनत घेतलात त्यातुन शेतक-यांचे तसे विश्वास संपादन केला.भागातील उद्योगाच्या माध्यमातून शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार यांच्या हाताला काम लावलात.म्हणून जनता तुमच्या पाठीशी आहेच आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत.बॅकेच्या माध्यमातून एक लाख कर्ज बिन व्याजी दिलोत आता राहिलेल्या नर्सीच्या गोदावरी साखर ,जय अंबिका कुटूंर, हुतात्मा साखर कारखाना हदगाव आधी कारखान्याचे कर्जे वसुल करुन शेतक-यांना तिन लाखापर्यंत बिन व्याजीकर्जे येणा-या काळात देऊ.कवळे गुरूजी तुम्ही सक्षमपणे उद्योग सांभाळता यातुन जनतेचे हित जोपासता हे अनेकांना होत नाही असे जिल्हा बॅकेचे अध्यक्ष वसंतराव पाटील चव्हाण म्हणाले.हवामान तंज्ञ पंजाबराव डक यांनी कोरडा दुष्काळ कसा पडतो व ओला दुष्काळ कसा पडतो यांतील गुणदोष माहिती देत त्यासाठी शेतक-यांनी शाश्वत पिक ऊस पिक मजबुत पिकांकडे शेतक-यांनी वळावे असे उपस्थित शेतक-यांना माहिती दिले.प्रस्ताविकातुन कवळे गुरूजीने येणा-या काळात शेतकरी ,बेरोजगार तरुण युवक,व्यापारी यांचे भरभराटीचे दिवस येतील काॅग्रेस पक्षाचे नेते अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या पाठीमाघे रहा असे म्हणाले.
यावेळी विक्रमी ऊस उत्पण काढणा-या शेतक-यांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाब डक हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते त्यांनी आपल्या भाषणातून शेतकऱ्यांना पावसाळ्या संबधी माहिती दिली ..
जास्तीची ऊस लागवड करणाऱ्या उत्कृष्ट शेतकऱ्यांचा उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला..
प पु यदुबन महाराज मठ संस्थान कोलंबी,प पु साईनाथ महाराज माहूर,प पु रमेश शास्त्री बाबा बिजेगावकर,यांच्या पावन आशीर्वादाने हा प्रदीपन सोहळा पार पडली या सर्व संत महंतांनी आपल्या मनोगतातून कवळे यांना आशीर्वाद दिला.
कवळे गुरुजी यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना कारखाना उभारणीसाठी खूप लोकांचे योगदान आहे ,गत वर्षी कारखाना सुरळीत चालला यंदाही सुरळीत चालू हा कारखाना शेतकाऱ्यांची कामधेनू आहे याचे जातन केले पाहिजे असेही ते म्हणाले अतिशय संघर्षातून आपण वाटचाल करत अहोत येणाऱ्या काळात आपल्या उसाला योग्य भाव कसा देण्यात येईल साठी माझे प्रयत्न राहणार आहेत आणि मला तुमच्या साथेची गरज आहे असे ही ते म्हणाले यावेळी दत्तहारी पाटील चोळखेकर, मोहन पाटील धुपेकर,संभाजी पाटील भिलवंडे,प्रल्हाद पाटील ढगे, माणिक पाटील हसेकर,पांडुरंग देशमुख गोरठेकर,सुभाष पेरेवार, बापूराव पाटील करकलेकर,प्रभू पाटील पुयड, गणेश पाटील सरसे, संदीप पाटील कवळे,परमेश्वर पाटील कवळे, रवींद्र पोतगटीवार, संजू पाटिल सेलगावकर,पिराजी पाटील चव्हाण,दत्तहारी पाटील आवरे,नागोराव पाटील रोशनगावकर,बापूसाहेब पाटील कोडगाकर,माधव कधारे, देवराव पाटील हसेकर,माधव पाटील शिंगणापूरकर ,मधुकर पाटील शिंदे,श्रीनिवास पाटील ढगे, आनंद पाटील कदम,गोविंद पाटील ढगे,पंजाब पाटील पवळे,यांच्यासह परिसरातील बाजूसंख्य शेतकरी उपस्थित होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भास्कर कदम यांनी केले आणि आभार प्रदर्शन यु जी कदम यांनी केले....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा