उमरी तालुक्यातील गरोदर मातांची हेळसांड,सोनोग्राफी साठी करावा लागतो चक्क 100 किलोमीटर प्रवास
उमरी तालुक्यातील गरोदर मातांची हेळसांड,सोनोग्राफी साठी करावा लागतो चक्क 100 किलोमीटर प्रवास नांदेड प्रतिनिधी: उमरी ग्रामीण रुग्णालय कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेतच असते, त्यातच अनेक दिवसांपासून गरोदर मातांची सोनोग्राफी बाबत व रुग्णाच्या होणाऱ्या गैरसोयी बाबत सामान्य जनतेतून नाराजीचा सुर उमटताना दिसत आहे,सरकारी रुग्णालय हे गोरगरीब रुग्णांसाठी खास दर्जाचे चे हक्काचे स्थान असते,उमरी ग्रामीण रुग्णलयामध्ये सोनोग्राफी मशीन उपलब्ध तर आहे, परंतु ती मशीन सोनोग्राफी तज्ञ नसल्यामुळे बंद स्वरूपा गवत आहे. तेंव्हा तालुक्या जवळील इतर दवाखान्यात सोनोग्राफी ची सोय उपलब्ध न करता, नांदेड येथिल एका खासगी रुग्णलयात गरोदर मातांना पाठविण्यात येते.त्यासाठी त्यांना 50 किलोमिटर जाने व 50 किलोमीटर येणे असे मिळून 100 किलोमिटर प्रवास अंतर पार करावे लागते व एक संपूर्ण दिवस वाया जातो ,त्यांच्या सोबतच्या नातेवाईकांना पण त्या परिस्थितीचा सामना करावा लागतो. गरोदर मातांना 5 ते 6 किलोमीटर प्रवास सहन होत नाही पण इथे 100 किलोमिटर प्रवासाचा त्रास सहन करावा लागत आहे,जे कधी कधी मातेला धोकादायक ठरू शकते...