आयआयबी महाफास्ट परीक्षेला राज्यभरातून आयआयबी च्या प्रत्येक सेंटरवर रेकॉर्डब्रेक गर्दी


ही तर आयआयबी करियर इन्स्टिट्यूट बाबत विद्यार्थी-पालकांनी दिलेली विश्वासाची पावती -- टीम आयआयबी...
     
नांदेड : आपल्या भविष्यातील डॉक्टर-इंजिनीअर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून इयत्ता १० वीतून ११ जाणारे हजारो विद्यार्थी उत्सुक आहेत. आपले डॉक्टर इंजिनिअर होण्याचे स्वप्न देशातील नामांकित आणि सर्वाधिक डॉक्टर घडविणारी शिक्षण संस्था म्हणून नावलौकिक असलेल्या आयआयबी करियर इन्स्टिट्यूटवर विद्यार्थी व पालकांचा विश्वास आजही कायम आहे हे रविवार, दि. 2 एप्रिल रोजी पार पडलेल्या आयआयबी महाफास्ट परीक्षेदरम्यान दिसून आला. प्रत्येक सेंटर वरती आयआयबी कॅम्पसमध्ये महाफास्ट परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थी-पालकांनी रेकॉर्डब्रेक गर्दी केल्याचे दिसून आले.

विद्यार्थी व पालकांचा उदंड प्रतिसाद लाभलेली आयआयबी महाफास्ट परीक्षा रविवारी पार पडली. दरवर्षीचे परीक्षेत देशपातळीवर आयआयबीचे वाढत जाणारे निकाल , विद्यार्थी हिताचा आयआयबी पॅटर्न व पालकांचा आयआयबी वर असलेला अतूट विश्वास आणि आलेल्या विद्यार्थ्याला मिळणारा पालकत्वाचा अनुभव, वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करण्याची हातोटी, नियोजनाने उच्च नितीमुल्ये जोपासणारी आयआयबी टीम, उच्चशिक्षित विद्यार्थी प्रिय शिक्षक या मुळे विद्यार्थी व पालकांचा आयआयबी वरील विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे हे अधोरेखित होत आहे. दरवर्षी आयआयबीच्या महाफास्ट परीक्षेला विक्रमी विद्यार्थी संख्या असतेच पण मागील वर्षी आयआयबी चे देशपातळीवर सर्वोच्च आलेले निकाल , प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातील कॉलेजमधे वाढत जाणारा आयआयबीयंस विद्यार्थ्यांचा टक्का राष्ट्रीय स्तरावरील AIIMS कॉलेज  व शिष्यवृत्ती परीक्षेतील पारदर्शकता, नीट जेईई च्या विद्यार्थ्यांसाठी नव्याने तयार झालेले आयआयबी कॅम्पस सर्व दृष्टीने विचार केला तर आयआयबीची वाटचाल परिपूर्ण इन्स्टिट्यूटच्या रूपाने होत आहे. विद्यार्थी पालकांचा प्रतिसाद व विश्वास पाहून टीम आयआयबी चे सर्व सदस्य पुढच्या जबाबदारीसाठी सज्ज असलेले दिसून आले. शहरातील पोलीस प्रशासन, दामिनी पथक, होस्टेल चालक-मालक, ऑटो चालक तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीत्या सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे टीम आयआयबीने मनःपूर्वक आभार मानले
स्कॉलरशिप (फास्ट) परीक्षा, परीक्षेतली पारदर्शकता, विद्यार्थी हिताप्रती असलेली बांधिलकी व सर्वोत्कृष्ट निकालासाठी विद्यार्थ्यांना लागणाऱ्या सर्व सुविधा याबाबत पालकांना माहिती आहे. आयआयबी इन्स्टिट्यूट वर विश्वास दाखवून आलेल्या विद्यार्थी व पालकांचे, आयआयबी महाफास्ट परीक्षेसाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पणे मोलाचे सहकार्य लाभलेल्या सर्व घटकांप्रती टीम आयआयबी ने मनापासून धन्यवाद व्यक्त केले. आयआयबी महाफास्ट परीक्षेच्या माध्यमातून आयआयबी सेंटर वरती येणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली शिक्षण सेवा देऊन सर्वोच्च निकाल देण्याची ग्वाही यावेळी टीम आयआयबीने दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सासऱ्याला मारणाऱ्या क्लास वन अधिकारी सुनेबद्दल धक्कादायक माहिती समोर, नागपूर पोलिसांची मोठी कारवाई

मनूर खून प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करा-महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेची मागणी

उमरी तालुक्यातील मनरेगा कामात कौट्यावधी चा भ्रष्टाचार मुख्याधिकारी यांच्या कार्यवाही कडे तालुक्याचे लक्ष