उमरी तालुक्यातील गरोदर मातांची हेळसांड,सोनोग्राफी साठी करावा लागतो चक्क 100 किलोमीटर प्रवास
उमरी तालुक्यातील गरोदर मातांची हेळसांड,सोनोग्राफी साठी करावा लागतो चक्क 100 किलोमीटर प्रवास
नांदेड प्रतिनिधी: उमरी ग्रामीण रुग्णालय कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेतच असते, त्यातच अनेक दिवसांपासून गरोदर मातांची सोनोग्राफी बाबत व रुग्णाच्या होणाऱ्या गैरसोयी बाबत सामान्य जनतेतून नाराजीचा सुर उमटताना दिसत आहे,सरकारी रुग्णालय हे गोरगरीब रुग्णांसाठी खास दर्जाचे चे हक्काचे स्थान असते,उमरी ग्रामीण रुग्णलयामध्ये सोनोग्राफी मशीन उपलब्ध तर आहे, परंतु ती मशीन सोनोग्राफी तज्ञ नसल्यामुळे बंद स्वरूपा गवत आहे. तेंव्हा तालुक्या जवळील इतर दवाखान्यात सोनोग्राफी ची सोय उपलब्ध न करता, नांदेड येथिल एका खासगी रुग्णलयात गरोदर मातांना पाठविण्यात येते.त्यासाठी त्यांना 50 किलोमिटर जाने व 50 किलोमीटर येणे असे मिळून 100 किलोमिटर प्रवास अंतर पार करावे लागते व एक संपूर्ण दिवस वाया जातो ,त्यांच्या सोबतच्या नातेवाईकांना पण त्या परिस्थितीचा सामना करावा लागतो. गरोदर मातांना 5 ते 6 किलोमीटर प्रवास सहन होत नाही पण इथे 100 किलोमिटर प्रवासाचा त्रास सहन करावा लागत आहे,जे कधी कधी मातेला धोकादायक ठरू शकते,ही परिस्थिती माहीत असताना सुध्धा त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात आहे,त्याच प्रमाणे रुग्णालयात असलेली क्ष-किरण मशीन ची तीच परिस्थिती आहे. इथे क्ष - किरण तज्ञ असून सुध्दा,ते नेहमीच बंद परिस्थितीमध्ये अढळते,ह्याविषयी बऱ्याच वेळा येथील अधिकारी यांना निदर्शनास आणून दिले तरी क्ष- किरण तज्ञ यांच्यावर कुठल्याच प्रकारची कार्यवाही झालेली दिसत नाही दवाखान्यात ओ.पी.डी. ही रोजच बी.डी.एस.,होमिओपॅथी, युनानी व आयुर्वेदिक डॉक्टर यांच्या मार्फत अलोप्याथी ची ट्रीटमेंट दिल्या जात आहे. जे की नियम बाह्य आहे. दवाखान्याच्या परिसरात सगळीकडे घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे, दवाखान्यात अंतररुग्णांना दिला जाणारा सकस आहार तो पण नियमा प्रमाणे दिल्या जात नाही, रूग्णालयत कार्यरत असलेले डॉक्टर यांचा ड्युटी चार्ट त्यांच्याच सोयी प्रमाणे बनवण्यात आला आहे, ज्यामध्ये त्यांची ड्युटी 48 तास पूर्ण करण्यासाठी डॉक्टरांनी चक्क सलग दोन दिवस ड्युटी करायची व बाकीचे दिवस दुसऱ्या डॉक्टर यांनी आपले 48 तास पूर्ण करायचे असे वेळापत्रक आप आपल्या सोयी प्रमाणे बनवले आहे,ही सर्व परिस्थिती पाहता रुग्णालयच सलाईन वर आहे की काय असा प्रश्न पडत आहे,काही दिवसांपूर्वी जी नेते मंडळी यांनी रुग्णालय बचाव म्हणून मोर्चा काढला होता त्या मंडळींना सामान्य जनतेची होणारी हेळसांड दिसत नाही असा प्रश्न निर्माण होतो,त्यांचे मोर्चे फक्त राजकीय स्वार्थ साधत स्वतःची पोळी भाजून घेण्या पुरतेच होते का? सामान्य जनतेचे म्हणून घेणारे नेते मंडळीनी ह्या गोष्टींवर आवाज का उठवत नाहीत काही मंडळींना ग्रामीण रुग्णालय फक्त कोण्या मोठ्या नेत्यांच्या वाढदीवसानिमित्त फक्त फळे वाटून मोठपणा करण्यासाठी आठवतो नंतर तिथे होणारी रुग्णांची हेळसांड दिसत नाही का? हा गंभीर प्रश्न सामान्य जनतेतून उपस्थित केल्या जात आहे.असो सर्व प्रश्न पाहता ग्रामीण रुग्णालय उमरी चे अगोदरचे दिवस चांगले म्हणले तरी हरकत नाही या आगोदर उमरी येथे जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. भोशीकर यांनीही ड्युटी बजावली होती त्यांना सुद्धा इथल्या परिस्थितीचा अभ्यास आहे तरी देखील त्यांच्या मार्फत कानाडोळा का केल्या जात आहे त्यांच्या अधिपत्याखाली असे घडूच कशे शकते,असे पाहता उमरी तालुक्यातच हा प्रश्न आहे की जिल्हयातील इतरही रुग्णालयात हीच परिस्थिती आहे हे सांगता येत नाही?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा