सासऱ्याला मारणाऱ्या क्लास वन अधिकारी सुनेबद्दल धक्कादायक माहिती समोर, नागपूर पोलिसांची मोठी कारवाई
नागपूर क्राईम: नागपूरमध्ये क्लास वन अधिकारी महिलेने तिच्या 82 वर्षांच्या सासऱ्याची सुपारी देऊन हत्या केली. सुरूवातीला कारने धडक दिल्याने हा मृत्यू झाल्याचं वाटत होतं, पण तपासानंतर सुनेनेच ही हत्या केल्याचं समोर आलं.क्लास वन अधिकारी असलेल्या अर्चना पुट्टेवार यांनी केलेल्या सासऱ्यांच्या हत्येने नागपूर हादरलं आहे. 82 वर्षीय पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या हत्या प्रकरणात न्यायालयाने अर्चनाला 15 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहेकाल न्यायालयाने यातील इतर आरोपी प्रशांत पार्लेवार, सचिन धार्मिक, सार्थक बागडे, नीरज नीमजे आणि पायल नागेश्वर या पाचही आरोपींना 15 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.
शुक्रवारी पोलीस सर्व आरोपींची समोरासमोर बसवून चौकशी करणार आहेत. या चौकशीत आणखी खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या हत्या प्रकरणात अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो, असा अर्चना पुट्टेवार यांचा मोबाईल फोन हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं आहे. या मोबाईल फोनच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचे खुलासे या प्रकरणात होण्याची शक्यता आहे.जेव्हापासून पोलिसांनी या प्रकरणात मास्टरमाइंड म्हणून अर्चना पुट्टेवारला अटक केली होती, तेव्हापासूनच अर्चना यांनी त्यांचा मोबाईल फोन गायब केला होता. अनेक प्रयत्न करूनही तो मोबाईल फोन पोलिसांना मिळू शकत नव्हताअर्चनाने तिच्या सासऱ्यांची हत्या संपत्तीच्या वादातून नाही तर काळ्या जादूच्या संशयातून केल्याचा पोलिसांना संशय आहे. पुरूषोत्तम पुट्टेवार हे धार्मिक वृत्तीचे होते. ते जास्त पूजा अर्चा करायचे. ते जादूटोणाही करतात असा सूनेला संशय होता. त्यांच्यामुळेच आपल्या माहेरच्या कुटुंबातल्या काही जणांचा मृत्यू झाल्याचं अर्चना यांना वाटायचं. अर्चनाचा मोठा भाऊ प्रवीण पार्लेवर याचा 2007 मध्ये अपघाती मृत्यू झाला होता. तर बहिणीचा मुंबईमध्ये असताना जळून मृत्यू झाला होता. बहिण-भावाचा हा मृत्यू काळ्या जादूने झाला, असा संशय सून अर्चना पट्टेवारला होता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा