नीट २०२४ च्या निकालातही आयआयबी महाराष्ट्रात अव्वल!गॅरंटी विश्वासाची १००% ओरिजनल निकालाची : टीम आयआयबी
नीट २०२४ च्या निकालातही आयआयबी महाराष्ट्रात अव्वल!
आयआयबीच्या नीट-२०२४ गुणवंताचा जल्लोषात सत्कार करण्यात आला मागील तब्बल २४ वर्षांपासून हजारो डॉक्टर घडवणारी “डॉक्टर्स फॅक्टरी” आणि “महाराष्ट्राचा महाब्रॅण्ड” म्हणून नावलौकिक असलेल्या आयआयबी इन्स्टिट्यूटने नीट-२०२४ मध्येही अद्वितीय यश संपादन केले आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही नीट २०२४ च्या निकालात आयआयबी ने आपला उच्चांक कायम राखला आहे.
यावर्षी आयआयबीच्या राख सिद्धांत महादेव ७१०, येसणे ओम सुधीर ७००, गायकवाड रुषिकेश नामदेव ७००, भगत प्राजक्ता हिरामण ७००, सय्यद अब्दुल रहमान इरफान अली ६९७, क्षीरसागर अथराव अनिल ६९६, पाटील रिया ललित ६९६, मिरजे सानिया बापुसो ६९५, सत्वधर महेश प्रसादराव ६९५, जोशी हर्ष संजयकुमार ६९५, पिंगळे अर्चित मनीष ६९१, बोलशेट्टे प्रतीक्षा रविकुमार ६९०, इंगोले अनुष्का गोविंद ६९०, निमगडे अहर्त सिद्धार्थ ६९० एकूण १४ विद्यार्थ्यांनी ७२० पैकी ६९० पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. केमिस्ट्री विषयात ११ विद्यार्थ्यांना १८० पैकी १८०, बायोलॉजी विषयात १० विद्यार्थ्यांना १८० पैकी १८०, फिजिक्स विषयात एक विद्यार्थी १८० पैकी १८०. याशिवाय अनेक विद्यार्थ्यांनी नीट-२०२३ मध्ये घवघवीत यश संपादन करत एमबीबीएस शिक्षणाकडे एक पाऊल पुढे टाकले आहे.
गुणवंतांची टीम आयआयबी बद्दल कृतज्ञता
कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थ्यांनीही आयआयबी बद्दल कृतज्ञता व्यक्त केली, टीम आयआयबी चे अचूक मार्गदर्शन, शिकवणी, नोट्स सराव परीक्षा आणि शंका निरसन या सर्व बाबींचा या यशात मोठा वाटा असल्याचे भावना यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. तसेच उपस्थित विद्यार्थांना शिक्षकांवर विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला. आयआयबी ने परीक्षेपर्यंत सराव करून घेत विशेष लक्ष देत वेळोवेळी मार्गदर्शन केल्यामुळे तयारी मजबूत झाली असे मत गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यानिमित्ताने या गुणवंत विद्यार्थ्यांनी घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक व्हावे तसेच आगामी काळात डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन या उदात्त हेतूने नीट-२०२४ मध्ये अलौकिक यश प्राप्त केलेल्या आयआयबीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, पुष्प गुच्छ आणि आयआयबी बॅग आणि विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी उपयोगाला येईल यासाठी रोख रकमेच्या बक्षिसासह सहकुटुंब सन्मान करण्यात आला. गुणवंताच्या सत्कार सोहळ्यावेळी व्यासपीठावर आयआयबीच्या सर्व शिक्षकांची उपस्थिती होती. आयआयबी करीअर इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी संचालक श्री दशरथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
आयआयबीचे हे यश म्हणजे विद्यार्थी आणि पालकांच्या विश्वासाची पावती – श्री दशरथ पाटील
नीट-२०२४ मध्ये उज्ज्वल प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मेहनती बरोबर विद्यार्थ्यांच्या या यशात टीम आयआयबीचा मोलाचा वाटा आहे असे मत यावेळी बोलताना विद्यार्थी पालकांनी व्यक्त केले. सातत्याने मिळणारे यश हे आयआयबी टिमच्या दूरदृष्टीतून केलेल्या नियोजनाचे आणि विद्यार्थी व पालकांच्या विश्वासाचे फलित असल्याचे मत आयआयबीचे मुख्य कार्यकारी संचालक श्री दशरथ पाटील यांनी व्यक्त केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा