पोस्ट्स

छत्रपती सेनेचे अध्यक्ष गणेश कदम यांनी आपल्या समर्थकांसह केला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश

इमेज
गणेश कदम यांना मिळणार पक्षाची मोठी जबाबदारी* छत्रपती युवा सेना संस्थापक अध्यक्ष मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक युवराज छत्रपती संभाजीराजे यांचे निकटवर्तीय गणेश कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नागपूर येथे आपल्या समर्थकांसह बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला यावेळी खासदार श्रीकांत शिंदे खासदार हेमंत गोडसे सचिव भाऊसाहेब चौधरी यावेळी उपस्थित होते गणेश कदम यांना पक्षाची मोठी जबाबदारी मिळणार असल्याचे समजते  गणेश कदम यांच्यासोबत छत्रपती युवा सेनेचे प्रदेशाचे सरचिटणीस ज्ञानेश्वर भोसले प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव बरकले संतोष टिळे सुभाष वाघ विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष यश बच्छाव चित्रपट आघाडीचे अध्यक्ष आनंद बच्छाव महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष पुष्पाताई जगताप प्रदेश कार्याध्यक्ष पुष्पक केवडकर मराठवाडा अध्यक्ष कृष्णा पराड संभाजीनगर जिल्हाप्रमुख पांडुरंग भुसारे जिल्हाप्रमुख वैशाली मोजाड जालना जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर बारबैले नाशिक जिल्हा प्रमुख तुषार भोसले ग्रामीण जिल्हाप्रमुख विलास गायधनी कसमादे जिल्हाप्रमुख कृष्णा देशमुख ठाणे जिल्हाप्रमुख नरेश पाटील अहमदनगर जि...

"IIB महा FAST" ११वीतून १२वी मध्ये प्रवेश परीक्षेला राज्यभरातून उदंड प्रतिसादप्रतिसाद,हजारो विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा ; हजारो विद्यार्थ्यांना मिळणार अंशतः किंवा १००% टक्के स्कॉलरशिप

इमेज
   "आयआयबीएन्स "ही ओळख निर्माण होण्यासाठी लातूर - नांदेड - पुणे येथील परीक्षा केंद्रावर  अवतरला विद्यार्थ्यांचा महासागर      नांदेड ; प्रतिनिधी   : देशभरात सर्वाधिक डॉक्टर घडविणारी अग्रगण्य शैक्षणिक संस्था म्हणून नावलौकिक प्राप्त करणाऱ्या आयआयबी इन्स्टिट्यूटचा विद्यार्थ्यांच्या हितासाठी महत्वकांक्षी उपक्रम असलेल्या "IIB महा FAST" या देशातील सर्वात मोठ्या स्कॉलरशिप परीक्षेला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाल्याचे पहावयास मिळाले.  "IIB महा FAST" ही फ्री ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट ११ डिसेंबर रोजी संपन्न झाली, या परीक्षेला संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी आयआयबीच्या नांदेड, लातूर आणि पुणे येथील कॅम्पसला अलोट गर्दी करत ऑफलाईन पद्धतीने परीक्षा दिली.  दरवर्षी आयआयबी फास्ट या परीक्षेच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांना १०० टक्के  किंवा अंशतः स्कॉलरशिप मिळत असते. डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून नीटची तयारी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना या परीक्षेची वर्षभर प्रतीक्षा असते. फिस मधे सवलत व आय...

भावी डॉक्टरांसाठी ११ डिसेंबर रोजी "IIB महा FAST"

इमेज
   नांदेड  : डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून जे विद्यार्थी आगामी नीट परीक्षेची तयारी करत इयत्ता ११ वीतून १२ वी मध्ये दाखल होणार आहेत त्यांच्यासाठी डॉक्टर घडविणारी गुणवत्तापूर्ण खाण म्हणून देशभर ओळख असलेल्या आयआयबी इन्स्टिट्यूटने "IIB महा FAST" ही फ्री ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट घेण्यात येणार आहे. ११ वी तून १२ वी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना यामुळे IIB इन्स्टिट्यूटमध्ये शिकण्याची सुवर्णसंधी प्राप्त होणार आहे. यासाठी "IIB महा FAST" ही फ्री ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट ११ डिसेंबर रोजी होणार असून ही सुवर्णसंधी मिळविण्यासाठी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करावे असे आव्हान आयआयबी टीम ने केले आहे.    आपला मुलगा किंवा मुलगी डॉक्टर व्हावी अशी अनेक पालकांची ईच्छा असते. परंतु, डॉक्टर होणे, चांगल्या मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळणे हे अत्यंत कठीण असल्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, दर्जेदार शिक्षण, सकारात्मक वातावरणाची सर्वाधिक आवश्यकता असते. दरम्यान डॉक्टर घडविणारी फॅक्टरी, गुणवत्तेची खाण म्हणून देशभरात ओळख असलेल्या IIB इन्स्टिट्यूटमध्ये हे वातावरणात अस...

ध्येय निश्चित असेल तर फक्त जिद्दीने अभ्यास सुरू करा यश मिळणारच : प्रा बानूगडे पाटीलमहाब्रँड आयआयबी तर्फे आयोजित “इंस्पायर” कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या अतिप्रचंड प्रतिसादाने संपन्न

इमेज
नांदेड – प्रतिनिधी येथील चांदोजी पावडे मंगलकार्यालयात सुप्रसिद्ध प्रबोधनकार, इतिहास अभ्यासक, लेखक, प्रेरणादायी वक्ते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना जिद्द,प्रेरणा व निरंतर कष्ट या त्रिसूत्री आधारलेल्या अनेक उदाहरणांसह विविधांगी मार्गदर्शन केले यावेळी विद्यार्थी,पालकांसह आयआयबीच्या संपूर्ण टिमची उपस्थिती होती.. ज अमोघ वर्क्तत्वासाठी सुप्रसिद्ध असलेल्या प्रा.बानगुडे यांनी विद्यार्थ्यांना आपले ध्येय निश्‍चित करून त्यासाठी कठोर आणि सातत्यपूर्ण कष्ट करण्याची ठेवा जितके कष्ट जास्त यश तितकेच मोठे असते तसेच आपण जिंकणार म्हणजे जिंकणारच अशी पक्की खूण मनाशी बांधा मग बघा यश हे तुमचेचं असेल असे ते म्हणाले पुढे बोलतांना ते म्हणाले की, कुठलेही काम लहान नाही म्हणून समोर आलेल प्रत्येक काम हे महत्वाचं असतं त्यामुळे प्रत्येक काम हे मन लावून करा म्हणजे मनापासून केलेल्या कामाला निभावलेल्या जबाबदारीतून सर्वोत्तम यश तुमच्या जवळ असेल यावेळी मुख्यवक्ते प्रा.नितीन बानूगडे पाटील यांचा आयआयबी बद्दल डॉक्टर्स फॅक्टरी असा गौरवपूर्ण उल्लेख आपल्या व्याखानात केला.. ...

आयआयबीच्या वतीने प्रा.नितीन बानुगडे पाटील यांचे विद्यार्थ्यांसाठी आयआयबी इन्स्पायर व्याखानाचे आयोजन

इमेज
नांदेड – प्रतिनिधी मेडकील प्रवेशासाठी अग्रगण्य संस्था असलेल्या आयआयबीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आयआयबी इन्स्पायर व्याख्यानाचे आयोजन येत्या २७ नोव्हेंबर रविवार रोजी नांदेड व लातूर या दोन्ही ठिकाणी करण्यात आले असून विद्यार्थी कसा असावा व त्याने स्पर्धेला कसे सामोरं जावे यासह विद्यार्थ्यांशी निगडीत अशा अनेक विषयावर प्रा.बानगुडे पाटील मार्गर्शन करणार असल्याची माहीती आयआयबीच्या वतीने देण्यात आली आहे ..    आजच्या अटीतटीच्या वेगवान स्पर्धेच्या काळात आपला विद्यार्थी टिकावा तसेच त्याच्यावर समाजशिल संस्कार व्हावेत या हेतूने मागील दोन दशकापेक्षा जास्त काळापासून आयआयबीच्या वतीने विद्यार्थ्यांच्या मनावर आणि करीअर वर संस्कार घडवणाऱ्या मार्गदर्शन व प्रोत्साहनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते याच वाटचालीत श्री प्रकाश बाबा आमटे तसेच ग्लोबल टिचर रणजित डिसले यांनी मागील वर्षी आयआयबीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता..         विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानत सुरू असलेल्या आयआयबीच्या वाटचालीतील हा एक महत्वपूर्ण असा मार्गदर्शनपर कार्यक्रम असून यात श...

कवळे गुरूजी यांनी नायगाव विधानसभा भागातील शेतक-यांना आर्थिक बाजुने भक्कम केलात ...माजी मंञी डि.पी.सावंत यांचे प्रतिपादन

इमेज
  वाघलवाडा साखर कारखान्याचा दुसरा बॉयलर प्रदीपन सोहळा संपन्न प्रगतशील शेतकरी नरहरी लक्ष्मण चव्हाण यांनी सहपत्नीक केली बॉयलर पूजा.. उमरी (बातमीदार) नायगाव विधानसभा मतदार संघात या भागात सिंचनाची सोय असल्या कारणाने शेतक-यांसाठी गुळपावडर व साखर कारखाने उभारून शेतक-यांचे व बेरोजगाराचे भले केलात त्यात  व्यापारपेठ वाढुन व्यापाराचे भले केलात.कमी खर्चात  विक्रमी  ऊसाचे उत्पादन  कसे काढले पाहिजे हे भागातील शेतक-यांना  समुहाकडुन बांधावर जाऊन माहिती देता.यात शेतकरी हा यांचा फायदा घेत ऊसाचे विक्रमी उत्पादन काढुन आर्थिकबाजुने सक्षम होत आहे.कवळे गुरूजी तुम्ही  भागातील शेतकरी  आर्थिक बाजुने सक्षम झाला पाहिजे यासाठी  अहोरात्र परिश्रम घेत असल्याने तुमचे स्वप्न सत्यात उतरत आहात. जसे पुर्वी या भागातील शेतकरी आर्थिक बाजुने सुधारला पाहिजे यासाठी वाघलवाडा साखर कारखाना स्वर्गीय शंकरराव चव्हाण व नेते अशोक चव्हाण यांनी हस्सेकर यांच्या माध्यमातून उभारले. हस्सेकर यांच्या निधनाने बंद  कारखाना कवळे गुरूजी  तुम्ही रितसर विकत घेऊन अवघ्या दोन महिन्यात च...

आयआयबी चा भारतात उच्चांक तब्बल ४ विद्यार्थ्यांना फिजिक्स मध्ये १८० पैकी १८० गुण …५५० पेक्षा अधिक गुणप्राप्त तब्बल ३७५ विद्यार्थ्यांचा पालकांसहीत एकत्रित गौरव..

इमेज
नांदेड – प्रतिनिधी  नीट-२०२२ च्या निकालात आयआयबी ने यावर्षी नवा उच्चांक प्रस्थापित करतांना मागील वर्षीच्या ‘नीट’ परीक्षेच्या आपल्याच निकालाची परंपरा खंडीत केली. व पुन्हा एकदा ‘नीट’ परीक्षेत याही वर्षी  अव्वल स्थान काबीज केले आहे. या परीक्षेत आयआयबीच्या अनिमेश राऊत ६९२ गुणांसह महाराष्ट्रात पहिला, तर पारस सूर्यवंशी ६९०, श्रुती वीर ६९०, आदित्य केंद्रे ६९० ,गौरव शिंदे ६८५, सौरभ दुघे ६८१, सक्षम करंडे ६८०, हर्षल बोकाडे ६८० असे गुण प्राप्त करत यावर्षीच्या नीट च्या निकालात नवा विक्रम प्रस्थापित केला यासोबतच अवघड समजल्या जाणाऱ्या  फिजिक्स विषयात गौरव शिंदे, अन्वेष गंगेवार, शर्वरी कवलकर,शिवम सुर्यवंशी आदी विद्यार्थ्यांनी १८० पैकी १८० गुण प्राप्त केले आहेत या सर्व यशस्वीतांचा एका कार्यक्रमात आयआयबी च्या वतीने पालकांसमवेत गौरव करण्यात आला .. यावेळी गुणवंताच्या गौरव सभारंभाचे प्रास्ताविक आयआयबी पीसीबी चे अकॅडेमिक संचालक प्रा. वाकोडे पाटील यांनी तर मार्गदर्शन संचालक डॉ. महेश पाटील यांनी केले आणि शेख सादिक यांनी आयआयबी च्या आत्तापर्यंतच्या यशाचा आढावा उपस्थितांच्या समोर मांड...