पोस्ट्स

कु.निकीता ग्योनोबा वहिंदे रा.हंगीरगा ता.उमरी जि.नांदेड दिव्यांग स्पर्धेमध्ये ऊभे राहून लांब उडी मध्ये राज्यात सर्वप्रथम क्रमांक पटकावला

इमेज
नांदेड प्रतिनिधी: दिव्यांगाच्या राज्य स्तरीय क्रीडा स्पर्धा 2023  दि.14ते 16 फेब्रुवारी रोजी म्हाळुंगे बालेवाडी पुणे येथे घेण्यात आल्या त्यात ,श्री गुरु गोविंदसिंघजी अंध निवासी विद्यालय  धनेगाव नांदेड येथील, विद्यार्थ्यांनी कु.निकीता ग्योनोबा वहिंदे रा.हंगीरगा ता.उमरी जि.नांदेड हि ऊभे राहून लांब उडी मध्ये राज्यात सर्वप्रथम क्रमांक पटकावला, त्या बद्दल शाळेचे संचालक श्री नागनाथराव पाटील कदम मुख्याध्यापक सौ. गंगासागर पाटील व प्रशिक्षक कल्पनाताई हिवराळे क्रीडा शिक्षक सुभाष पाटील जोगदंड यांनी अभिनंदन केले

औरंगाबाद आणि अकोला शाखेत प्रवेश घेण्यासाठी सुवर्णसंधी,रविवारी होणार "आयआयबी महाफास्ट" परीक्षा

इमेज
औरंगाबाद  : आयआयबी करियर इन्स्टिट्युट अकोला आणि औरंगाबाद शाखेत  इयत्ता ११ वीतून १२ वी जाणाऱ्या आणि नीट, जेईई अर्थात मेडिकल, इंजिनिअरिंगच्या पूर्व परीक्षेच्या तयारी करण्याचा चंग बांधलेल्या विद्यार्थ्यांच्या सुविधेकरिता आयआयबी करियर इन्स्टिट्यूटच्या वतीने रविवार, दि. १२ फेब्रुवारी रोजी "आयआयबी महाफास्ट" या ऑफलाईन  परीक्षेचे आयोजन केले आहे. यामध्ये  गुणवत्ताधारक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे अंशतः किंवा संपूर्णतः फीस माफ करण्यात येणार असल्याची माहिती आयआयबी व्यवस्थापणाने दिली आहे. आपल्या गुणवत्तापूर्ण शिक्षण, काटेकोरपणे वेळेचे नियोजन आणि उत्तम शैक्षणिक सुविधांचामुळे आजमितीला आयआयबी देशाच्या घराघरापर्यंत पोहोचली आहे. मागील तब्बल २३ वर्षांपासून  आयआयबीचे विद्यार्थी नेत्रदीपक यश प्राप्त करत आहेत. राज्यातील कोणत्याही विद्यार्थ्याचे  डॉक्टर-इंजिनिअर होण्याचे स्वप्न केवळ आर्थिक परिस्थिती, आवश्यक सुविधेमुळे धूसर न होता त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयआयबी कायमच प्रयत्नशील असते. दरम्यान, याचाच एक भाग म्हणून केवळ नांदेड आणि ...
क्षेत्रिय कार्यालय निहाय मंडप तपासणी पथक गठीत     नांदेड (जिमाका) दि. 1 :- मा. उच्‍च न्‍यायालय मुंबई येथे उपस्थित जनहित याचिका क्र.173/2010 संदर्भात सार्वजनिक सण / उत्‍सव / समारंभ याप्रसंगी उभारण्‍यात येणाऱ्या मंडप, पेंडॉलच्‍या तपासणीच्‍या अनुषंगाने दिलेल्या आदेशानुसार नांदेड जिल्‍हयातंर्गत नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड हद्दीमधील मंडप / पेंडॉल तपासणी करण्‍याबाबत पथके गठित करण्‍यात आलेले आहे. या तपासणी पथकाची माहिती पुढीलप्रमाणे आहे.   पथक क्र. 1 क्षेत्रीय कार्यालय क्र. 1, कार्यक्षेत्र नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालय क्र. 1 (तरोडा सांगवी) अंतर्गत संपुर्ण क्षेत्राअंतर्गत तपासणी पथक सदस्‍याचे नाव, पदनाम, कार्यालयीन दुरध्‍वनी क्रमांक, मोबाईल क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. क्षेत्रीय अधिकारी राजेश चव्‍हाण- 9595333181, पो.नि.पो.स्‍टे. विमानतळ नांदेड ए. एस. काकडे- 02462-221100, 9923131121, पो.नि.पो.स्‍टे. भाग्‍यनगर नांदेड सुधाकर आडे 02462-261364, 9552082544, प्र. कार्यालय अधीक्षक श्री. नितीन, श्री. संतोष जिंतुरकर 8888801958, प्र. वसुली पर्यवेक्षक ...

पुणे, कोल्हापूर, औरंगाबादनंतर आता "आयआयबी अकोल्याला दाखल"

इमेज
विदर्भातील विद्यार्थ्यांना मिळणार डॉक्टर-इंजिनिअर होण्याची योग्य दिशा ! नांदेड : डॉक्टर-इंजिनिअर होण्याचे अनेक विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे स्वप्न असते. मात्र, हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी केवळ ईच्छाचं नव्हे तर योग्य मार्गदर्शनाची आवश्यक असते. दरम्यान,   देशभरात सर्वाधिक डॉक्टर देणाऱ्या आयआयबी इन्स्टिट्यूटने राज्यभर विद्यार्थ्यांना डॉक्टर-इंजिनिअर घडविण्याचा विडा उचलत आपल्या शाखेचे जाळे विस्तारित केले आहे. नांदेड, लातूर येथे उज्ज्वल यशाचे शिखर गाठल्यानंतर पुणे, कोल्हापूर आणि औरंगाबादनंतर विदर्भातील विद्यार्थ्यांच्या हितार्थ अकोला येथे आयआयबी इन्स्टिटय़ूटने आपली नवीन शाखा स्थापन केली असून या शाखेमुळे विदर्भातील विद्यार्थ्यांना  डॉक्टर-इंजिनिअर होण्याची योग्य दिशा मिळणार आहे. देशात आज असे एकही एम्स मेडिकल कॉलेज किंवा इतर कोणते नामांकित वैद्यकीय महाविद्यालय नाही जेथे आयआयबी इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी शिक्षण घेत नाही, किंवा वैद्यकीय शिक्षण घेऊन एक निष्णात डॉक्टर म्हणून बाहेर पडला नाही. याचे मुख्य कारण म्हणजे मागील तब्बल २३ वर्षांपासून आयआयबी इन्स्टिट्यूट शै...

यशासाठी ध्येयासक्ती, सातत्य व संघर्षाची तयारी हवी- प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे प्रतिपादन; 'आयआयबी-इन्स्पायर' कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

इमेज
पुणे : "डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे ध्येय उराशी बाळगून तुम्ही अभ्यास करत आहात. अशा आव्हानात्मक क्षेत्रात यश मिळवायचे असेल, तर ध्येयासक्ती, अभ्यासातील सातत्य व संघर्षाची तयारी असायलाच हवी. इतर विचार सोडून ध्येयावर लक्ष केंद्रित केल्यास आभाळही ठेंगणे होईल," असे प्रतिपादन प्रेरणादायी वक्ते, इतिहास अभ्यासक प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी केले. 'आयआयबी इन्स्टिटयूट' सारखा मार्गदर्शक तुमच्यासोबत असल्यावर यश हमखास मिळणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आयआयबी पुणे शाखेच्या वतीने 'आयआयबी-इन्स्पायर' कार्यक्रमात प्रा. नितीन बानगुडे पाटील हजारो विद्यार्थ्यांच्या समुदायाला मार्गदर्शन करत होते. साधारण चार हजार विद्यार्थी व पालकांनी याचा लाभ घेतला. मोरवाडी येथील मैदानावर झालेल्या या कार्यक्रमावेळी आमदार महेशदादा लांडगे, निवृत्त मुख्य न्यायाधीश एन. एस. लोहारे, कामगार नेते सचिनभैया लांडगे, मा. उपमहापौर तुषार भाऊ हिंगे, उपमहापौर नानी घुले, नगरसेवक समीर मासुळकर, नगरसेवक दिनेश यादव, प्रथम श्रेणी वैद्यकीय अधिकारी डॉ प्रकाश गुरुतवाड, पिंपरी चिंचवड लघु उद्योजक संघटना अ...

शिवसेना नेते स्व राजाभाऊ कदम यांचे स्वप्न बाळासाहेबांची शिवसेना पूर्ण करणार खासदार हेमंत गोडसे

इमेज
शिवसेना नेते स्व राजाभाऊ कदम यांचे स्वप्न बाळासाहेबांची शिवसेना पूर्ण करणार खासदार हेमंत गोडसे   प्रतिनिधी:- हिंदुत्वाच्या रक्षणासाठी मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेना स्थापन करणारे हिंदुरुदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे नेणारे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करणे शिवसेना ज्येष्ठ नेते स्वर्गीय राजाभाऊ कदम यांची चिरंजीव गणेश कदम व विक्रम कदम यांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला त्याबद्दल कदम परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला,मान्यवरांचे स्वागत फटाक्यांच्या आतिश बाजी करून ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिकचे लोकप्रिय खासदार मा.हेमंत गोडसे उपस्थित होते मा नगरसेवक रमेश धोंगडे , प्रताप मेहरोलीया,ज्योतीताई खोले, विजय कातोरे शरद जगताप बाळासाहेब जमदडे जाधव ताई आदी मान्यवर उपस्थित होते सर्व मान्यवरांचा सत्कार तुळशीराम कदम संजय कदम दिनेश कदम  संदीप कदम दीपक कदम मयूर कदम स्वप्निल कदम राम कदम  विजय कदम आकाश कदम अविनाश...

छत्रपती सेनेचे अध्यक्ष गणेश कदम यांनी आपल्या समर्थकांसह केला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश

इमेज
गणेश कदम यांना मिळणार पक्षाची मोठी जबाबदारी* छत्रपती युवा सेना संस्थापक अध्यक्ष मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक युवराज छत्रपती संभाजीराजे यांचे निकटवर्तीय गणेश कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नागपूर येथे आपल्या समर्थकांसह बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला यावेळी खासदार श्रीकांत शिंदे खासदार हेमंत गोडसे सचिव भाऊसाहेब चौधरी यावेळी उपस्थित होते गणेश कदम यांना पक्षाची मोठी जबाबदारी मिळणार असल्याचे समजते  गणेश कदम यांच्यासोबत छत्रपती युवा सेनेचे प्रदेशाचे सरचिटणीस ज्ञानेश्वर भोसले प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव बरकले संतोष टिळे सुभाष वाघ विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष यश बच्छाव चित्रपट आघाडीचे अध्यक्ष आनंद बच्छाव महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष पुष्पाताई जगताप प्रदेश कार्याध्यक्ष पुष्पक केवडकर मराठवाडा अध्यक्ष कृष्णा पराड संभाजीनगर जिल्हाप्रमुख पांडुरंग भुसारे जिल्हाप्रमुख वैशाली मोजाड जालना जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर बारबैले नाशिक जिल्हा प्रमुख तुषार भोसले ग्रामीण जिल्हाप्रमुख विलास गायधनी कसमादे जिल्हाप्रमुख कृष्णा देशमुख ठाणे जिल्हाप्रमुख नरेश पाटील अहमदनगर जि...