पोस्ट्स

विद्यार्थ्यांसाठी आयआयबी इन्स्पायर व्याखानाचे आयोजनप्रेरणादायी वक्ते प्रबोधनकार प्रा. नितीन बानुगडे पाटील करणार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

इमेज
नांदेड प्रतिनिधी -मेडकील व इंजिनीयर प्रवेशासाठी अग्रगण्य संस्था असलेल्या आयआयबीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आयआयबी इन्स्पायर व्याख्यानाचे आयोजन येत्या 12  डिसेंबर रोजी नांदेड व लातूर या दोन्ही ठिकाणी करण्यात आले असून विद्यार्थी कसा असावा व त्याने स्पर्धेला कसे सामोरं जावे यासह विद्यार्थ्यांशी निगडीत अशा अनेक विषयावर व समस्यांवर प्रा.बानुगडे पाटील मार्गर्शन करणार असल्याची माहीती आयआयबीचे  मुख्य कार्यकारी संचालक दशरथ पाटील यांच्या वतीने देण्यात आली आहे .            आयआयबी च्या वतीने नांदेड येथे मंगळवार दि 12 रोजी सकाळी साडेदहा वाजता डी मार्ट जवळील कॅनॉल रोडवरील चांदोजी पावडे मंगलकार्यालयात तर लातूर येथे सावेवाडी येथील दिवाणजी मंगल कार्यालयात सायंकाळी साडेपाच वाजता, या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या अटीतटीच्या वेगवान स्पर्धेच्या काळात आपला विद्यार्थी टिकावा तसेच त्याच्यावर समाजशिल संस्कार व्हावेत या हेतूने इन्स्टिट्यूट कडून सातत्याने विविध उपक्रम राबवले जातात त्याचाच एक हा भाग म्हणून मागील दोन दशकापेक्षा जास्त काळा...

महाब्रॅण्ड आयआयबी च्या महानिकालाचा महासोहळा संपन्न !

इमेज

चूलीत गेले तुमचे शिक्षण, प्रसिध्द डॉ.अरुण गोधमगावकर यांचे वृद्धाश्रमातच निधन

डाॅ. अरुण गोधमगांवकर सर, हे एक नामांकित बालरोग तज्ञ डॉक्टर होते.त्यांनी आयुष्यभर अनेक बालकांना जीवनदान दिले.   ते मागील अनेक दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील रुक्मिणी.वृद्धाश्रमात राहत होते, ते नांदेड जिल्ह्यातील मूळचे नायगाव तालुक्यातील गोधमगाव चे होते, परंतु ते नंतर बिलोलीला स्थायिक झाले होते  ते स्वतःच्या मुलाला एम. डी. डॉक्टर व मूलीलाही स्री रोग तज्ञ डॉक्टर करून, काही वर्षापू्र्विच त्या दोघांनाही अमेरीकेला पाठवले होते, सून व जावई ते पण डॉक्टरच आहेत, सगळेच आपापल्या जीवनात व्यस्त असल्याने, आई वडीलाकडे लक्ष द्यायला कोणिच रिकामे नव्हते.  उतारवयात डॉक्टर साहेबांच्या पत्निचे निधन झाले, त्यावेळेस देखील अमेरिका मधून त्यांचा ना मूलगा आला, ना ही मूलगी आली, मग गावकऱ्यांनी अंत्यसंस्कार केले. Nत्यानंतर डॉक्टर साहेब लातूर जिल्ह्यातील अहमदपूर य़ेथे रुक्मिणी वृद्धाश्रम मध्ये रहायला गेले, चार वर्षाचा काळ तेथे व्यतीत केला, आणि नुकतेच डॉ.अरुण गोधमगावकर सर यांचे दुःखद निधन झाले,  वृद्धाश्रम चालकाने त्यांच्या अमेरीकास्थीत मुलगा, मुलगी आणि जावई यांना निरोप कळवला, परंतु ...

नायगाव विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार राजेशजी पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

इमेज
नायगाव विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार राजेशजी पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

उमरी तालुक्यातील गरोदर मातांची हेळसांड,सोनोग्राफी साठी करावा लागतो चक्क 100 किलोमीटर प्रवास

इमेज
उमरी तालुक्यातील गरोदर मातांची हेळसांड,सोनोग्राफी साठी करावा लागतो चक्क 100 किलोमीटर प्रवास नांदेड प्रतिनिधी: उमरी ग्रामीण रुग्णालय कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेतच असते, त्यातच अनेक दिवसांपासून गरोदर मातांची सोनोग्राफी बाबत व रुग्णाच्या होणाऱ्या गैरसोयी बाबत सामान्य जनतेतून नाराजीचा सुर उमटताना दिसत आहे,सरकारी रुग्णालय हे गोरगरीब रुग्णांसाठी खास दर्जाचे चे हक्काचे स्थान असते,उमरी ग्रामीण रुग्णलयामध्ये सोनोग्राफी मशीन उपलब्ध तर आहे, परंतु ती मशीन सोनोग्राफी तज्ञ नसल्यामुळे बंद स्वरूपा गवत आहे. तेंव्हा तालुक्या जवळील इतर दवाखान्यात सोनोग्राफी ची सोय उपलब्ध न करता, नांदेड येथिल एका खासगी रुग्णलयात गरोदर मातांना पाठविण्यात येते.त्यासाठी त्यांना 50 किलोमिटर जाने व 50 किलोमीटर येणे असे मिळून 100 किलोमिटर प्रवास अंतर पार करावे लागते व एक संपूर्ण दिवस वाया जातो ,त्यांच्या सोबतच्या नातेवाईकांना पण त्या परिस्थितीचा सामना करावा लागतो. गरोदर मातांना 5 ते 6 किलोमीटर प्रवास सहन होत नाही पण इथे 100 किलोमिटर प्रवासाचा त्रास सहन करावा लागत आहे,जे कधी कधी मातेला धोकादायक ठरू शकते...

आयआयबी महाफास्ट परीक्षेला राज्यभरातून आयआयबी च्या प्रत्येक सेंटरवर रेकॉर्डब्रेक गर्दी

इमेज
ही तर आयआयबी करियर इन्स्टिट्यूट बाबत विद्यार्थी-पालकांनी दिलेली विश्वासाची पावती -- टीम आयआयबी...       नांदेड : आपल्या भविष्यातील डॉक्टर-इंजिनीअर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून इयत्ता १० वीतून ११ जाणारे हजारो विद्यार्थी उत्सुक आहेत. आपले डॉक्टर इंजिनिअर होण्याचे स्वप्न देशातील नामांकित आणि सर्वाधिक डॉक्टर घडविणारी शिक्षण संस्था म्हणून नावलौकिक असलेल्या आयआयबी करियर इन्स्टिट्यूटवर विद्यार्थी व पालकांचा विश्वास आजही कायम आहे हे रविवार, दि. 2 एप्रिल रोजी पार पडलेल्या आयआयबी महाफास्ट परीक्षेदरम्यान दिसून आला. प्रत्येक सेंटर वरती आयआयबी कॅम्पसमध्ये महाफास्ट परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थी-पालकांनी रेकॉर्डब्रेक गर्दी केल्याचे दिसून आले. विद्यार्थी व पालकांचा उदंड प्रतिसाद लाभलेली आयआयबी महाफास्ट परीक्षा रविवारी पार पडली. दरवर्षीचे परीक्षेत देशपातळीवर आयआयबीचे वाढत जाणारे निकाल , विद्यार्थी हिताचा आयआयबी पॅटर्न व पालकांचा आयआयबी वर असलेला अतूट विश्वास आणि आलेल्या विद्यार्थ्याला मिळणारा पालकत्वाचा अनुभव, वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करण्याची हातोटी, नियोजनाने उच्च नितीमुल्ये जोपासणारी आ...

नागरिकांना स्वस्त दराने रेती मिळणार; अनधिकृत उत्खननाला आळा घालणारे नवे रेती धोरण

राज्यातील नागरिकांना स्वस्त दराने रेती मिळण्यासाठी तसेच अनधिकृत रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी नवे सर्वंकष सुधारित रेती धोरण तयार करण्यात आले असून, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या धोरणास मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.या धोरणानुसार प्रायोगिक तत्त्वावर एक वर्षासाठी सर्व नागरिकांना प्रति ब्रास ६०० रुपये (रुपये १३३ प्रति मेट्रीक टन) वाळू विक्रीचा दर निश्चित करण्यात आलेला आहे. यात स्वामित्व धनाची रक्कम माफ करण्यात येईल. याशिवाय जिल्हा खनीज प्रतिष्ठान निधी व वाहतूक परवाना सेवा शुल्क इ. खर्च देखील आकारण्यात येतील. वाळुचे उत्खनन, उत्खननानंतर वाळुची डेपो पर्यंत वाहतूक, डेपोची निर्मिती आणि व्यवस्थापन यासाठी एक निविदा प्रक्रीया राबवण्यात येईल. यातून वाळू किंवा रेती उत्खनन करण्यात येईल. ही रेती शासनाच्या डेपोमध्ये नेली जाईल व तिथून या रेतीची विक्री करण्यात येईल.नदी पात्रातील वाळू गटाचे निरिक्षण करण्याची कार्यवाही तहसिलदारांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती करेल. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरिय...