वंचित बहुजन आघाडी नगर परिषद निवडणूक पुर्ण ताकदीने लढवणार*"""फारुख अहेमद"""

मुदखेड ता.प्र.
आगामी काळात नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती होणाऱ्या निवडणूका वंचित बहुजन आघाडी संपूर्ण आठरा पकड समाजाला जागृत करून त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करून निवडणुका पुर्ण ताकदीने लढवणार असल्याचे मुदखेड येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी आयोजन केलेल्या जाहीर सभेत राज्य प्रवक्ता वं.ब.आघाडी मा.फरुख अहेमद यांनी बोलताना सांगितले आहे.
या जाहीर सभेला राज्य प्रवक्ते वं.ब.आ. फारुख अहेमद, राज्य उपाध्यक्ष वं.ब.आघाडी गोविंद दळवी,जिल्हानेते सुनील सोनसळे,यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी माजी सभापती बालाजी सुर्यतळे, तालुका अध्यक्ष गंगाधर पाटिल पवार, का.क तालुका अध्यक्ष मोहणराव कांबळे,माजी नगरसेवक अँड.कमलेश चौदंते, तालुका संपर्क प्रमुख राहुल आप्पा चौदंते,फुलसिंग चव्हाण,सूत्रसंचालन डि. जी.चौदंते सर यांनी केले तर आभार व्यक्त जनार्दन कोलते यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी निखिल चौदंते, शंकर चौदंते, बाबुराव कोलते, सचिन हौसरे,स्वप्नील वाघमारे, रामजी भंडारे,रोशन कोलते,प्रभाकर पाटिल पवार,सुनिल गायकवाड,यांनी परिश्रम घेतला होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सासऱ्याला मारणाऱ्या क्लास वन अधिकारी सुनेबद्दल धक्कादायक माहिती समोर, नागपूर पोलिसांची मोठी कारवाई

मनूर खून प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करा-महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेची मागणी

उमरी तालुक्यातील मनरेगा कामात कौट्यावधी चा भ्रष्टाचार मुख्याधिकारी यांच्या कार्यवाही कडे तालुक्याचे लक्ष