पोस्ट्स

उमरी शहरात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली.१ ली ते ७ वी इंग्रजी माध्यम शाळा खुलेआम सुरू

इमेज
कोरोनाचे संकट संपते म्हणताच ओमीक्रोन या विषाणूंने प्रादुरभाव पसरण्यास सुरवात केली,त्यामुळे राज्य सरकारने  ओमीक्रोन चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरी भागातील 1 ली ते 7 वी वर्गाची व ग्रामीण भागात 1 ली ते 5 वी वर्गाची शाळा 13 तारखे नंतर सुरू करण्यास जिल्हाधिकारी श्री विपीन इटनकर साहेब यांनी आदेश देऊन सुध्दा उमरी शहरातील 1 ली ते 7 वी साठी  इंग्रजी माध्यम शाळा  जिल्हाधिकारी यांच्या  आदेशाला केराची टोपली दाखवत, केंद्रप्रमुख , विस्तारअधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्या कृपेमुळे उमरी शहरातील इंग्रजी माध्यम शाळा खुले आम चालू आहेत.त्याविषयी गटशिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता शहरातील कुठल्याच  इंग्रजी शाळा सुरू नाहीत असे सरळसरळ तपासणी न करता त्यांनी विधान दिले,पण शहरातील सर्वच नागरिकांना इंग्रजी माध्यम शाळा सर्रास पणे सुरु आहेत हे  दिसत असताना शासकीय शाळाना वेगळा नियम का? शासकीय शाळा बंद का? असा प्रश्न पालकांना पडला आहे.इंग्रजी माध्यमातील शाळे पेक्षा जास्त शासकीय शाळांमध्ये गोरगरिबांचे पाल्य शिक्षण घेतात मग इंग्रजी माध्यम शाळेतील विद्यार्थ्यांना एक नि...

कृष्णरच्या किर्ती गोल्ड कंपनीवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी संबधित चार विभागाच्या अधिकाऱ्यांना नायगावच्या तहसीलदारा मार्फत निवेदन कार्यवाही नाही झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा ----- सोनालीताई हंबर्डे यांचा इशारा

इमेज
नायगांव तालुक्यातील कृष्णूर येथील अद्योगिक वसाहतीत निर्मिती करण्यात आलेली किर्ती गोल्ड कंपनी ही गेल्या अनेक वर्षा पासून शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी करून मोठया प्रमाणात लूट करत असल्यामुळे व नायगांव तालुक्यातील वृक्षाची कंपनीने चांगलीच वाट लावली असल्यामुळे या सदरच्या कंपनीवर कार्यावाही करण्यात यावी या मागणीसाठी सोनालीताई पाटील हंबर्डे भ्रष्टाचार निर्मूलन अध्यक्ष व अंकुशकुमार देगावकर यांनी नायागांवच्या तहसीलदारा मार्फत चार विभागाच्या अधिकाऱ्याना निवेदन दिले आहे तालुक्यातील कृष्णूर येथील कीर्ती गोल्ड कंपनी गेल्या अनेक वर्षापासून नायगाव तालुक्यातील कीर्ती गोल्ड ही कंपनी ही एका धनदांडग्या भांडवलदाराची असल्यामुळे वनविभागाचे अधिकारी कंपनी जाऊन पाहणी केल्याचा बनवट कांगावा केला व आर्थिक तडजोडीत कंपनीत लाकूडच सापडले नसल्याचा देखावा करून वनपाल ग्रुपवार यांनी उडवा उडावीचे उत्तर देऊन कीर्ती गोल्ड कंपनीला पाठीशी घालण्याच काम वन विभागाचे अधिकारी करत असल्याचे सरळ सरळ दिसून येत असल्यामुळे सदरच्या वनविभागा अधिकाऱ्यासह कंपनीवर कार्यावाही करण्यात यावी असी मागणी सोनालीताई हंबर्डे व अंकुशकुमार देगा...

उमरी येथे श्री गुरू गोविंदसिंघ नगर येथे श्री गुरुनानक देवजी महाराज यांच्या 552 व्या जयंती उत्साहात साजरी

इमेज
उमरी येथे श्री गुरू गोविंदसिंघ नगर येथे श्री गुरुनानक देवजी महाराज यांच्या 552 व्या जयंती निमित्ताने अरदास करण्यात आली व गल्लीतील समाज बांधवांना फळे व मिठाई वाटप करण्यात आले त्या वेळेस.शीख समाजाचे युवा नेते श्री आझादसिंग बावरी.श्रीमती.लक्ष्मीबाई आयासिंग बावरी.श्रीमती.सजणिबाई उदलसिंग टाक.मोहनसिंग बावरी.शेरसिंग खिची.लक्ष्मणसिंग बावरी.जगु सिंग खिची.कुलजीतसिंग बावरी.दयाल सिंग बावरी.दानसिंग बावरी .करण सिंग बावरी.जगजितसिंग तीलपितया.अजितसिंग टाक.व समाजातील नागरिक उपस्थित होते

विजपडून शेतकऱ्यांचे सोयाबीन जळून खाक

इमेज
उमरी तालुका हुंडा गंगा पट्टी येथे रात्री दहा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास विजेचा कडकडाट होऊन सोयाबीनच्या ढगावर वीज कोसळून जवळपास एक हेक्टर 38 गुंठे साडेतीन बॅग सोयाबीनच्या ढगावर वीज कोसळून सर्व सोयाबीनचे काड जळून खाक झाले आहे तरी गेल्या मुसळधार पावसामुळे बरंचसं नुस्कान झालेली असते वेळीसुद्धा शेतकऱ्यांनी आपल्या जीवाचे रान करून शेतामध्ये काडी काडी जमा करून एका जागी ढग लावले असताना रात्री. आठ नऊ दहा च्या सुमारास व वार वावधान पाणी येण्याच्या शक्यते मध्ये वीज कडाडून अचानक मध्ये वीज ढगावर कोसळली आणि सर्व सोयाबीनचे काढ हे जळून राक झाले आहे. शेतकरी गजानंद थेटे असे यांनी सांगितले आहे उंमरी तहसीलदार यांना निवेदन देऊन व कृषी सहाय्यक नागलवाड यांनी जाय मुख्या वर येऊन पंचनामा करून त्याठिकाणची चौकशी केली आहे तरी अशा या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय करावे पहिले ढगफुटीमुळे झालेले अतोनात नुसकान आणि इथून तिथून काडी काडी जमा करून जे काही आपल्या शेतामध्ये झालेले पिकांची कापणी व जमा करून जे काही केले होते तेही आज निसर्गाच्या साधने झालेली हानी ही शेतकऱ्याची कुठेच भरून निघणारी नाही म्हणून शेतकऱ्याच दुःख कळवळ...

उमरी तालुक्यातील चुकीची आणेवारी दुरुस्ती करून संबंधित आणेवारी ठरवणाऱ्या अधिकारी यांच्यावर कार्यवाही करावी -छत्रपती युवासेना

इमेज
उमरी;महसूल प्रशासनाने उमरी तालुक्यातील सतत पावसाने व पुर परिस्थिती असताना शेतकऱ्यांच्या हातात आलेले सोयाबीन, कापूस, उडीद,मुग अनेक पिक अतिवृष्टीमुळे वाहुन गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.येवढी नुकसानदायक परिस्थिती असताना महसूल प्रशासनाने चुकीची 62 टक्के पैसेवारी काढून शेतकर्यांची चेष्टा केली आहे तरी जिल्हाधिकाऱ्यांनी चुकीच्या नजर आणेवारी मध्ये वस्तू निसट दुरूस्ती करण्याच्या सुचना संबंधित अधिकाऱ्यांना द्याव्यात त्याच प्रमाणे चुकीच्या काढण्यात आलेल्या आनेवारीशी संबंधित अधिकाऱ्यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी उमरी छत्रपती युवा सेना संघटनेच्या वतीने नायब तहसीलदार उमरी यांना छ.यु.से.जिल्हा प्रमुख अॅन्ड संभाजी नरवाडे साहेब यांच्या आदेशानुसार निवेदन आला. गेल्या चार वर्षापूर्वी अधिकारी यांच्या चुकीमुळे तालुक्यातील शेतकरी यांना त्यावेळेसच्या नुकसानीचा मोबदला मिळाला नव्हता या खरीप हंगामा मध्ये दोन ते तीन वेळा अतिवृष्टी झाली तसेच गोदावरी नदीला पुर आल्यामुळे गोदाकाठच्या गावासह अनेक गावातील सर्व पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले असे असताना ६२ टक्के आणेवारी काढणे म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा...

उमरी शहरातील घरकुल लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा शेवटचा धनादेश वाटप

इमेज
 उमरी शहरातील प्रधानमंत्री घरकूल आवास योजने अंतर्गत घरकुल 54 लाभार्थी यांना शेवट चा हप्त्याच्याचे 27 लक्ष रुपायचे धनादेश वाटप करतांना युवा नेते उमरी पंचायत समिती उपसभापती मा.शिरीष गोरठेकर साहेब,नांदेड मद्यवर्तीबँक चे संचालक मा. कैलासभाऊ बापुसाहेब गोरठेकर साहेब यांच्या हस्ते वाटत करण्यात आले त्यावेळी मा.सौ.अनुराधा सदानंद खांडरे,अध्यक्षा, मुख्याधिकारी मा. श्रीश्रीकांत कांबळे साहेब, गटनेते मा. प्रविणभाऊ सारडा,मा.विष्णू पंडित साहेब,सौ.दिपाली अशोक मामीडवार,जि. नि. स.सदस्य तथा,नगरसेविका,श्री.अनंत किशनराव रॅपनवाड, नगरसेवक श्रीमती अनुसयाबाई विश्वनाथ कटकदवणे,नगरसेविका,श्री.साईनाथ हिरामण जमदाडे,नगरसेवक, श्री.रतन बाबुराव खंदारे,नगरसेवक,श्री.शंकर विठ्ठलराव शिंदे,नगरसेवक, मरीयमबी मौलाना सय्यद,नगरसेविका, भगवान मुदीराज (नगरसेवक प्रतिनिधी), ,  गजानन खांडरे( नगरसेविका प्रतिनिधी), श्री.इरबा मरीबा शेळके,नगरसेवक, श्री.शेख बाबु बेग हुसेन बेग,नगरसेवक, नंदकिशोर डहाळे,(नगरसेवक प्रतिनिधी) शोभा सुरेशराव गुंडेवाड,नगरसेविका, श्री.ईश्वर विठ्ठलराव सवई,नगरसेवक, कलीमा जमील शेख,नगरसेविका, नगरपरिषद...

एका जुगार अड्यावर शस्त्रांच्या धाकावर झाली लाखो रुपयांची लुट

नांदेड,- नांदेड पोलीसांनी अनेक गुन्हेगारांना गजाआड केले आहे. याचा कांही एक प्रश्न नाही. पण गुन्हेगारी संपली नाही. शहरातील नदीकाठी चालणाऱ्या एका “उल्ला’ या नावाच्या माणसाद्वारे चालवला जाणारा जुगार अड्डा लुटण्यात आला. जुगाऱ्यांना लुटले याचाही कांही रोष होवू शकत नाही. पण या भागातील सर्वसामान्य नागरीकांना सुध्दा दहशतीखाली जगावे लागत आहे. कारण लुट करणाऱ्यांकडे बंदुका होत्या. याचा शोध पोलीस घेतील की नाही हे माहित नाही पण असा भयंकर प्रकार 17 सप्टेंबरच्या रात्री 3 वाजेच्यादरम्यान गोदावरी नदी काठी घडला आहे. अत्यंत खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 17 सप्टेंबर रोजी शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीकाठी वसलेल्या एका नगरात एक जुगार अड्डा चालतो. या जुगार अड्‌ड्याची माहिती पोलीस विभागाला होती की नाही याबद्दल कांही एक सांगता येणार नाही. पण सुत्र सांगतात पोलीसांना सुध्दा या जुगार अड्‌ड्याची माहिती नाही. या दिवशी या जुगार अड्‌ड्यात जबर लुट झाली. 17 सप्टेंबरच्या रात्री 3 वाजेच्यासुमारास या ठिकाणी दुचाकीवर आलेले अनेक दरोडेखोर आत शिरले त्यांची संंख्या 13 ते 14 असेल असे सांगण्यात आले. प्रत्येकाकडे घातक...