पोस्ट्स

उमरी तालुक्यात एक रुपयात पीक विमा: अर्ज भरण्यासाठी शंभर-दोनशे रुपये !

इमेज
नांदेड (उमरी) : एक रुपया पीक विमा योजनेत देगलूर शहरात व तालुक्यात शेतकऱ्यांची होत आहे. या योजनेचा लूट अर्ज भरण्यासाठी विमा कंपनीकडून केंद्र चालकांना रक्कम दिली जाते, तरीही शेतकऱ्यांकडून सीएससी केंद्र चालक रक्कम आकारत असल्याच्या तक्रारी येत आहेत. विमा एक रुपयाचा आणि अर्ज भरण्यासाठी शंभर- दोनशे रुपये असा प्रकार अनेक ठिकाणी सुरू आहे. याबाबत शेतकऱ्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. पासून राज्यात २०२३ - २४ 'सर्वसमावेशक पीक विमा योजना राज्य शासनाच्या वतीने राबवण्यात येत आहे. त्याअनुषंगाने शेतकरी हिस्स्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून स्वतः तसेच बँक, विमा कंपनी प्रतिनिधी व सामूहिक सेवा केंद्र यांच्या मार्फत योजने नोंदणी करता येते. जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप २०२३ ते रब्बी २०२५-२६ या हंगामाकरिता तीन वर्षांसाठी निश्चित केलेल्या शेतातील, निश्चित केलेल्या पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरून शेतकऱ्याला केवळ एक रुपया भरून या योजनेत सहभागी होता येणार आहे. या योजनेसाठी सीएससीवर (सामूहिक से...

सासऱ्याला मारणाऱ्या क्लास वन अधिकारी सुनेबद्दल धक्कादायक माहिती समोर, नागपूर पोलिसांची मोठी कारवाई

इमेज
नागपूर क्राईम: नागपूरमध्ये क्लास वन अधिकारी महिलेने तिच्या 82 वर्षांच्या सासऱ्याची सुपारी देऊन हत्या केली. सुरूवातीला कारने धडक दिल्याने हा मृत्यू झाल्याचं वाटत होतं, पण तपासानंतर सुनेनेच ही हत्या केल्याचं समोर आलं.क्लास वन अधिकारी असलेल्या अर्चना पुट्टेवार यांनी केलेल्या सासऱ्यांच्या हत्येने नागपूर हादरलं आहे. 82 वर्षीय पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या हत्या प्रकरणात न्यायालयाने अर्चनाला 15 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहेकाल न्यायालयाने यातील इतर आरोपी प्रशांत पार्लेवार, सचिन धार्मिक, सार्थक बागडे, नीरज नीमजे आणि पायल नागेश्वर या पाचही आरोपींना 15 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. शुक्रवारी पोलीस सर्व आरोपींची समोरासमोर बसवून चौकशी करणार आहेत. या चौकशीत आणखी खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या हत्या प्रकरणात अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो, असा अर्चना पुट्टेवार यांचा मोबाईल फोन हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं आहे. या मोबाईल फोनच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचे खुलासे या प्रकरणात होण्याची शक्यता आहे.जेव्हापासून पोलिसांनी या प्रकरणात मास्ट...

उमरी तालुक्यातील मनरेगा कामात कौट्यावधी चा भ्रष्टाचार मुख्याधिकारी यांच्या कार्यवाही कडे तालुक्याचे लक्ष

उमरी, ता. २५ (बातमीदार)मागील काही दिवसांपूर्वी हुंडा येथील शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष यांनी मनरेगा विभागातील इंजिनियर यांच्याकडून होणारी शेतकऱ्यांची लूट संबंधी विस्तार अधिकारी यांच्या दालनात शेतकरी यांच्या मार्फत चौकशीचे निवेदन देण्यात आले होते तेंव्हा उमरीचे तालुक्याचे विस्तार अधिकारी यांनी ह्याविषयी चौकशी करू असे सांगितले . उमरी  पंचायत समितीचे कंत्राटी तांत्रिक सहायक व इतर कर्मचाऱ्यांच्या संगनमताने रोहयोच्या कामाचे तीनतेरा वाजवण्यात आले असून, सिंचन विहिरी, गायगोठे आणि शेततळ्याच्या कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. या भ्रष्टाचाराची गटविकास अधिकारी यांनी काही ठिकाणी जाऊन चौकशी केली असता संगनमताने केलेल्या भ्रष्टाचाराचे पितळ उघडे पडले आहे खरे पण त्यामुळे या भ्रष्टाचार करणाऱ्यांवर काय कारवाई होते याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. केंद्र सरकार गोरगरीब जनतेच्या हाताला काम मिळावे आणि शेतकऱ्यांच्या जीवनात प्रगती व्हावी यासाठी गायगोठे, सिंचन विहिरी आणि शेततळ्याचे कामे करण्याला प्राधान्य देत आहे; पण उमरी पंचायत समितीमध्ये सर्व सहमतीने रोहय...

चिखलीकरांच्या प्रचारासाठी आलेल्या अशोक चव्हाणांना मराठा समाजाचा विरोध

इमेज
नांदेड : माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे नेते अशोक चव्हाण यांना मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी गावात आलेल्या अशोक चव्हाण यांना मराठा आंदोलकांनी प्रचंड विरोध केला. तसेच चव्हाण यांना गावात येऊ देणार नसल्याची भूमिका घेतली. आंदोलकांचा रोष पाहता अशोकचव्हाण यांनी देखील गावातून काढता पाय घेतला. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सूचित करूनही मराठा आरक्षणाची धग मात्र अजूनही कायम आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांना प्रचंड विरोध केल्याचे पाहायला मिळाले. नांदेड लोकसभेचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचाराच्या अनुषंगान ते या गावात मतदारांच्या भेटी-गाठीसाठी आले होते. मात्र, यावेळी ‘एक मराठा-लाख मराठा’सह विविध घोषणा देत मराठा समाजातील तरुणांनी संताप व्यक्त केला. यावेळी गावकरी मोठ्या संख्येने जमा झाले होते. शेकडो जणांचा रोषपाहून अशोक चव्हाण यांनीही काढता पाय घेतला.

विद्यार्थ्यांसाठी आयआयबी इन्स्पायर व्याखानाचे आयोजनप्रेरणादायी वक्ते प्रबोधनकार प्रा. नितीन बानुगडे पाटील करणार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

इमेज
नांदेड प्रतिनिधी -मेडकील व इंजिनीयर प्रवेशासाठी अग्रगण्य संस्था असलेल्या आयआयबीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आयआयबी इन्स्पायर व्याख्यानाचे आयोजन येत्या 12  डिसेंबर रोजी नांदेड व लातूर या दोन्ही ठिकाणी करण्यात आले असून विद्यार्थी कसा असावा व त्याने स्पर्धेला कसे सामोरं जावे यासह विद्यार्थ्यांशी निगडीत अशा अनेक विषयावर व समस्यांवर प्रा.बानुगडे पाटील मार्गर्शन करणार असल्याची माहीती आयआयबीचे  मुख्य कार्यकारी संचालक दशरथ पाटील यांच्या वतीने देण्यात आली आहे .            आयआयबी च्या वतीने नांदेड येथे मंगळवार दि 12 रोजी सकाळी साडेदहा वाजता डी मार्ट जवळील कॅनॉल रोडवरील चांदोजी पावडे मंगलकार्यालयात तर लातूर येथे सावेवाडी येथील दिवाणजी मंगल कार्यालयात सायंकाळी साडेपाच वाजता, या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या अटीतटीच्या वेगवान स्पर्धेच्या काळात आपला विद्यार्थी टिकावा तसेच त्याच्यावर समाजशिल संस्कार व्हावेत या हेतूने इन्स्टिट्यूट कडून सातत्याने विविध उपक्रम राबवले जातात त्याचाच एक हा भाग म्हणून मागील दोन दशकापेक्षा जास्त काळा...

महाब्रॅण्ड आयआयबी च्या महानिकालाचा महासोहळा संपन्न !

इमेज

चूलीत गेले तुमचे शिक्षण, प्रसिध्द डॉ.अरुण गोधमगावकर यांचे वृद्धाश्रमातच निधन

डाॅ. अरुण गोधमगांवकर सर, हे एक नामांकित बालरोग तज्ञ डॉक्टर होते.त्यांनी आयुष्यभर अनेक बालकांना जीवनदान दिले.   ते मागील अनेक दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील रुक्मिणी.वृद्धाश्रमात राहत होते, ते नांदेड जिल्ह्यातील मूळचे नायगाव तालुक्यातील गोधमगाव चे होते, परंतु ते नंतर बिलोलीला स्थायिक झाले होते  ते स्वतःच्या मुलाला एम. डी. डॉक्टर व मूलीलाही स्री रोग तज्ञ डॉक्टर करून, काही वर्षापू्र्विच त्या दोघांनाही अमेरीकेला पाठवले होते, सून व जावई ते पण डॉक्टरच आहेत, सगळेच आपापल्या जीवनात व्यस्त असल्याने, आई वडीलाकडे लक्ष द्यायला कोणिच रिकामे नव्हते.  उतारवयात डॉक्टर साहेबांच्या पत्निचे निधन झाले, त्यावेळेस देखील अमेरिका मधून त्यांचा ना मूलगा आला, ना ही मूलगी आली, मग गावकऱ्यांनी अंत्यसंस्कार केले. Nत्यानंतर डॉक्टर साहेब लातूर जिल्ह्यातील अहमदपूर य़ेथे रुक्मिणी वृद्धाश्रम मध्ये रहायला गेले, चार वर्षाचा काळ तेथे व्यतीत केला, आणि नुकतेच डॉ.अरुण गोधमगावकर सर यांचे दुःखद निधन झाले,  वृद्धाश्रम चालकाने त्यांच्या अमेरीकास्थीत मुलगा, मुलगी आणि जावई यांना निरोप कळवला, परंतु ...