माहुर गडावरील सदगुरू साईनाथ महाराज बितनाळकर यांनी आत्याचार पिडीत मतीमंद मुलीचा उदरनिर्वाहचा उचला विडा
.माहुर गडावरील सदगुरू साईनाथ महाराज बितनाळकर यांनी आत्याचार पिडीत मतीमंद मुलीचा उदरनिर्वाहचा उचला विडा
* महाराज्यानी इतर महाराज पुढे ठेवला आर्दश .
* सामाजीक बांघलकी जोपासुन अनेक विक्रम .
* किर्तन , प्रवचन , नामस्मरण जोडसह अन्नदानाला दिले महत्व .
* कोरोणा लॉकडावून कलावधीत १५० क्वीटल तांदूळ वाटप .
* सामाजीक कार्यक्रमात पुढाकारात अग्रगण्य .
* राष्ट्रसंत गाढगे महाराज यांचा विचाराचा वसा घेवून किर्तन .
* उमरी तालुक्याचे नाव केले रोशन .
----------------------------- उमरी ( प्रतिनिधी ) उमरी तालुक्याचे भुमिपुत्र द .भ .प . सदगुरू साईनाथ महाराज बितनाळकर श्रीक्षेत्र माहूर गड यांनी एका अपंग मतीमंद असलेल्या आत्याचारी पिडीत मुलीचा व आजीचा उदरनिर्वाहचा खर्चाचा विडा उचला असून त्यांच्या महान कार्याचे महाराष्ट्रातील इतर महाराजा पुढे आर्दश ठेवण्या जोगा आहे .
माहूर शहरातील दि ३ सप्टेंबर रोजीची घटना शरीराने विकंलाग असलेली अंपग मतीमंद असलेल्या मुलीवर त्याच समाजाच्या नराधमाने आत्याचार केला . सदर मुलीला नांदेड येथे उपचारासाठी पाठविण्यात आले . कौटूंबीक परिस्थिती एवढी वाईट होती की ' पिडीत मुलीची आजी नातीचे पालन पोषण करण्यासाठी भांडन बरतन धुण्याचे काम करून उदरनिर्वाह भागवत होती . पण ३ सप्टेबर रोजी त्या मुलीवर आत्याचार झाल्याची खबर सदगुरु मठाधिसपती साईनाथ महाराज यांना कळाली त्यांनी कुंटुबाची परिस्थिती पाहून त्या पिडीत अंपग आणी मतीमंद असलेल्या मुलीचा सर्व उदरनिर्वाह करण्याचा खर्चाचा विडा उचला आहे .
द भ . प . साईनाथ महाराज यांचे श्रीक्षेत्र माहूर येथे आनंद दत्तधाम आश्रम (मठ) आहे . त्यांनी समाजीक बांधीलकी जोपासुन अनेक सामाजीक उपक्रम राबविले आहेत .
कोरोणा लॉकडावून काळात १५० ते २०० क्वींटल तांदूळ गरजूना वाटप केले आहे . राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचा स्वच्छतेचा वसा घेवून गाव तिथे किर्तन पण अगोदर हातात झाडू घेवून गाव स्वच्छता करून नंतर किर्तन प्रवचन करण्याचे अभियान सुरु केले आहे .
आज ही माहूर ग्रामीण रुग्णालय येथे सर्व रुग्णाला सकाळ आणी संध्याकाळी जेवणाचे डब्बे देण्याचे उपक्रम चालूच आहे .
मठाधीरापती साईनाथ महाराज बितनाळकर यांच्या आनंद धाम आश्रमात किर्तन , नाम स्मरण , प्रवचन , या भक्तीमय वातावर सह अन्नदानाला महत्व देतात . माहूर येथे देव देविच्या दर्शनास येणारे भावीक भक्त साईनाथ महाराज यांच्या मठावर आश्रयास राहतात . या आश्रमात दररोज येणार्या भावीक भक्ताना रोजच अन्नदानाच्या पंगती आयोजन केले जाते . दर पोर्णीमेला किर्तन प्रवचन ठेवले जाते . दर वर्षी दतजन्म उत्सव आणी सदगुरू द .भ प दत्तात्र्य महाराज बितनाळकर उर्फ वसमतकर यांच्या पुण्यतिथी मोठा कार्यक्रम घेण्यात येतो महाराष्ट्र , कर्नाटक , आंध्रा प्रदेश , विर्दभातून तीर ते चाळीस हजार शिष्यगन भक्तीमय वातावरणात उपस्थित राहतात या हजारो भक्ताना स्वादिस्ट चवदार भोजन व प्रसाद देण्यात येते . असा अनेक सामाजीक उपक्रमात हे आश्रम मठाधिसपती साईनाथ महाराज प्रसिध्द आहेत . अशा सामाजीक , राजकीय नेत्याच्या सहवासात असणारे परपंच करित मोक्षाचा .... मार्ग दाखवणारे सदगुरु साईनाथ महाराज यांनी त्या अंपग आणी मतिमंद असलेल्या मुलींचा उदरनिर्वाहाचा खर्चाचा विडा उचलल्याने सर्वत्र महाराजाचे कौतुक होत आहे . साईनाथ महाराज यांनी कोरोणा प्रतिबंधक लसीकरण माहूर गडावर ठेवले असुन जिल्हाधिकारी , उप जिल्हाधिकारी , तहसीलदार , इतर विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार असून माहुर गडावर दर्शनासाठी येणार्या भावीक भक्तानी लसीकरण डोस घ्यावे असे आव्हाण ही सदगुरू साईनाथ महाराज बितनाळकर यांनी केली आहे .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा