कृष्णरच्या किर्ती गोल्ड कंपनीवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी संबधित चार विभागाच्या अधिकाऱ्यांना नायगावच्या तहसीलदारा मार्फत निवेदन कार्यवाही नाही झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा ----- सोनालीताई हंबर्डे यांचा इशारा

नायगांव तालुक्यातील कृष्णूर येथील अद्योगिक वसाहतीत निर्मिती करण्यात आलेली किर्ती गोल्ड कंपनी ही गेल्या अनेक वर्षा पासून शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी करून मोठया प्रमाणात लूट करत असल्यामुळे व नायगांव तालुक्यातील वृक्षाची कंपनीने चांगलीच वाट लावली असल्यामुळे या सदरच्या कंपनीवर कार्यावाही करण्यात यावी या मागणीसाठी सोनालीताई पाटील हंबर्डे भ्रष्टाचार निर्मूलन अध्यक्ष व अंकुशकुमार देगावकर यांनी नायागांवच्या तहसीलदारा मार्फत चार विभागाच्या अधिकाऱ्याना निवेदन दिले आहे तालुक्यातील कृष्णूर येथील कीर्ती गोल्ड कंपनी गेल्या अनेक वर्षापासून नायगाव तालुक्यातील कीर्ती गोल्ड ही कंपनी ही एका धनदांडग्या भांडवलदाराची असल्यामुळे वनविभागाचे अधिकारी कंपनी जाऊन पाहणी केल्याचा बनवट कांगावा केला व आर्थिक तडजोडीत कंपनीत लाकूडच सापडले नसल्याचा देखावा करून वनपाल ग्रुपवार यांनी उडवा उडावीचे उत्तर देऊन कीर्ती गोल्ड कंपनीला पाठीशी घालण्याच काम वन विभागाचे अधिकारी करत असल्याचे सरळ सरळ दिसून येत असल्यामुळे सदरच्या वनविभागा अधिकाऱ्यासह कंपनीवर कार्यावाही करण्यात यावी असी मागणी सोनालीताई हंबर्डे व अंकुशकुमार देगा...