पोस्ट्स

बाबाराव टोकलवाड यांचे निधन

नायगाव बाजार-- बिलोली तालुक्यातील आदमपुर येथील रहिवासी बाबाराव मारोती टोकलवाड वय ५८ वर्ष यांचे दि १७ एप्रील २०२१ रोजी सकाळी १० वाजता निधन झाले.  बाबाराव टोकलवाड यांच्या पार्थिव देहावर १७ एप्रील रोजी दुपारी ५ वाजता आदमपुर येथील स्मशानभू-मीत अंत्यसंसकार करण्यात आले. त्यांच्या पच्छात पत्नी, तिन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परीवार आहे. आदमपुर येथील रामदास टोकलवाड व देवीदास टोकलवाड यांचे ते वडील होत. अंत्यविधीस सरपंच साईनाथ चिंतले, माजी सरपंच अंबादास शिनगारे, बालाजीराव बिद्राळे, बसवंत बिद्राळे,हावगीराव मुंगडे सह गावातील नागरिक, पाहुणे, मिञ मंडळी उपस्थित होते.

अविनाश जाधव यांचा अभिष्टचिंतन सोहळा

इमेज
दि.31 डिसेंबर ला पार पडला पाच दिवसांचा हा आठवडा एक संदेश देणारा ठरला 27 तारखेला सर्व विद्यार्थी मित्रांनी शाळा साफसफाई केली 28 ला गावातील रस्ते साफ केले 29 ला गावातील नाल्या साफ करून पूर्ण गावाचं मन जिंकत पूर्ण गावातील लोकांना या ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत गावातील लोकांना समाविष्ट करून घेतले 30 तारखेला विद्यार्थ्यांकडून 8 ते 1 अस पाच तास अभ्यास करून विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी निर्माण केली 31 डिसेंबर सकाळी लहान मुलांनी शाळेत वाढदिवस साजरा केला नंतर डॉ.माधवराव विभुते साहेब यांनी त्यांच्या क्लिनिक मद्ये साजरा केला डॉ.राहुल जाधव दत्ताहारी कांगुलकर, दिगंबर सावंत, केदार तम्मेवर,योगेश मुक्कावार आदींनी सर्वांनी त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी बोलवून शाल श्रीफळ हार असा सत्कार केला  सायंकाळी सहा वाजता पळसगाव तांडा येथे अविनाश जाधव मित्रपरिवार यांच्याकडून वाढदिवसाचा आयोजन केलं होत त्यात अविनाश जाधव यांच्याकडून गुणवंत विद्यार्थ्याचं सत्कार करण्यात आला त्यानंतर स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना महत्त्वाची पुस्तक देण्यात आली या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असलेले शिरीष भाऊ देशमुख...

उद्योजक मारोतराव कवळे गुरूजी यांच्या वाढदिवसा निमित्त एक जानेवारी रोजी उमरीत रक्तदान शिबिराचे आयोजन

 उमरी.ता.२८ बातमीदार  नांदेड जिल्हातील एमव्हीके व व्हीपीके उद्योग समुहाचे चेअरमन मारोतराव कवळे गुरूजी यांचा एक जानेवारी रोजी वाढदिवस आहे.या वाढदिवसा निमित्त एमव्हीके साखर कारखाना कुसूमनगर वाघलवाडा येथे रक्तदान तसेच प्रयागनगर सिंधी येथील व्हीपीके गुळपावडर कारखाना  आणी उमरी मौढा मैदान येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले तसेच  उमरी ग्रामीण रुग्णालयातील  रुग्णांना फळे वाटप व  सामाजिक बांधिलकी जोपासत  गरजुना  बॅल्याॅकेट वाटप होणार असल्याचे माहिती कवळे गुरूजी मिञमंडळाच्या वतीने देण्यात आले.     एक जानेवारी रोजी उद्योजक मारोतराव कवळे गुरूजी यांनी सकाळी सात वाजता संत दासगणु महाराज समाधी गोरठा येथे दर्शन होईल.७.३० वाजता हनुमान गड मारोती मंदिर दर्शन, सकाळी आठ वाजता जुन्नी उमरी येथील बाबा महाराज समाधी मंदिर  दर्शन, ८.३० वाजता सकाळी साईबाबा मंदिर दर्शन,सकाळी नऊ वाजता पञकार नरेंद्र  येरावार यांच्या निवासस्थानी सन्मान सोहळा,  ९.३० वाजता जेष्ठ व्यापारी तथा डिआरयुसी रेल्वे सदस्य पारसमल दर्डा यांच्या निवासस्थानी सत्कार सोहळा,...
इमेज
नायगाव दि 24- नांदेड नायगाव रस्त्यावर धावणाऱ्या आयचर टेम्पो चा सिनेस्टाईल मोटार सायकलने पाठलाग लुटारूंच्या टोळीने पाठलाग केला व टेम्पो अडवला,कॅबिन मध्ये जबरदस्तीने घुसून चालक व वाचकाला तलवारीचा धाक दाखवुन नगदी रक्कम 4,95,000/- (अक्षरी – चार लाख पंचाण्णव हजार) रुपये बळजबरीने हिसकावुन घेवुन हे लुटारू पळाले होते,या आरोपीतांना कुंटुर पोलिसांनी केवळ 36 तासात मुद्देमालासह अटक केल्याची घटना घडली आहे. या धाडसी कृत्याबद्दल कुंटुर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या बाबत अधिक वृत्त असे की फिर्यादी शेख असीफ अली शेख मुनवर अली वय 33 वर्ष व्यवसाय – अंडा व्यापारी (अली अॅग्रो फार्मिंग सिध्दीपेठ) रा.12-1-58 गणेश नगर सिध्दीपेठ ता. जि.सिध्दीपेठ राज्य – तेलगंणा यांच्या कंपनीतील आयचर टेम्पो क्र.TS-16 -UC-2343 चे ड्रायव्हर मिझा अफझल बेग व महमद जमील हे दोघेजण अकोला येथे अंडे विक्री करुन सिद्धीपेठH कडे परत येत होते, विक्री केलेल्या अंडयाची रक्कम 4,95,000/- (अक्षरी चार लाख पंचाण्णव हजार) रुपये त्यांच्याजवळ होती, नांदेड ते नायगांव टप्प्यात मौ.देगाव फाटा येथे दि.15/12/2020 रोजी सकाळी अंदाजे वेळ 04.10 वाजता टेम्प...

देविदास म्याकलवाड बितनाळकर यांचे ऱ्हदयविकाराने निधंन

इमेज
  उमरी ( प्रतिनिधी ) उमरी तालुक्यातील मौजे बितनाळ येथिल देविदास नरसिगां म्याकलवाड यांचे  दि. १८ डिसेबंर २०२० रोजी शुक्रवारी सकाळी १० :०० वाजता हृदयविकाकाराच्या तीव्र झटक्याने नांदेड येथे उपचारा दरम्यान निधन झाले आहे. मृत्यु समयी त्यांचे  वय ५० वर्ष होते . देविदास म्याकलवाड हे सर्व जाती धर्मा सोबत व व्यापारी आणी राजकीय  नेत्यासोबत " एक मानुसकी जपणारा एक सामाजीक हिरा होता. मनमिळावू समाज कार्यकर्ता चे  निधन झाल्याने बितनाळ व परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांचा अत्यंविधी शोककळात बितनाळ येथे दि. १८ डिसेबंर रोजी दुपारी ३ : ०० वाजता करण्यात आला  आहे. त्यांच्या पश्च्यात दोन मुले , तीन भाऊ , चार बहीनी , पत्नी , आई , नातवंड असा मोठा परिवार आहे. सदगुरू द. भ' प. साईनाथ महाराज बितनाळकर यांचे ते भाचे होत.

इतर साखर कारखान्या पेक्षा उसाला जास्त भाव मिळवून देऊ मारोतराव को कवळे गुरुजी ळी

  नांदेड:- उमरी तालुक्यातील वाघलवाडा येथे साखर पुजन कार्यक्रम.ऊस उत्पादक शेतक-यांसाठी व्हीपीके उद्योग समूहाच्या वतीने शेतीच्या आसपास नाला असेल तो नाला खोलीकरण व सरळीकरण करुन घेण्यासाठी व तसेच तळ्यातील गाळ ऊपसा करुन शेतात गाळ टाकण्यासाठी आम्ही जेसीबी मशीन उपलब्ध करुन देऊ. यांचा फायदा शेतक-यांनी घावा तसेच त्या मशनरीला लागेल तेवढे तेवढा डिझेल खर्च स्वता शेतक-यांनी करुन घ्यावे. आम्ही गेल्या वर्षी ऊसाला २५०० रुपये प्रति टन भाव दिला.याही वर्षी ऊसाला इतर साखर कारखाना पेक्षा जास्तीचा भाव देऊ.असे उपस्थित शेतक-यांना एमव्हीके व व्हीपीके कारखान्याचे चेअरमन मारोतराव कवळे गुरूजी यांनी वाघलवाडा साखर कारखान्याच्या साखर पुजनाच्या वेळी प्रतिपादन केले. या वेळी एमव्हीके कुसूमनगर साखर कारखाना वाघलवाडा येथील सोमवारी ता १६ रोजी साखर गाळपाचे पुजन जावाई प्रशांत पाटिल ढोणे व चेअरमन मारोतराव कवळे गुरूजी आदीच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चेअरमन मारोतराव कवळे गुरूजी, संचालक संदिप पाटिल कवळे, परमेश्वर पाटिल कवळे, प्रभाकरराव पुयेड, सरपंच सुहागन पाटिल भोसले, सुभाषराव भोसले, बालाजीराव देशमुख, लक्ष्मण पाटिल हरेगावक...
 रविंद्र गायकवाड यांची भाजपाच्या उमरी शहर सरचिटणीस पदी निवड. उमरी:- दि. 12/11/2020 रोजी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची दुपारी 4:30 वाजता मार्केट कमिटी उमरी येथे बैठक घेण्यात आली असून सामाजिक कार्यकर्ते किशनदादा गायकवाड कुदळेकर यांचे थोरले चिरंजीव रविंद्र गायकवाड कुदळेकर भाजपाचे सक्रिय सदस्य यांचे पक्षातील आजपर्यंतचे योगदान व उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन पक्ष श्रेष्ठींनी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या उमरी शहर सरचिटणीस पदी निवड करण्यात आली असून खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी त्यांचे पुष्पहार घालून नियुक्ती पत्र दिले आहे.  भाजपाच्या शहर सरचिटणीस पदी रविंद्र गायकवाड यांची निवड झाल्याबद्दल माजी आ.बापूसाहेब गोरठेकर, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस तथा उमरी तालुका प्रभारी श्रावण पाटील भिलवंडे, गणेश गाढे, शहराध्यक्ष विष्णू पंडित, रावसाहेब पाटील कुदळेकर, किशनदादा गायकवाड कुदळेकर,  हनुमंत जाधव कुदळेकर, नामदेव पाटील कुदळेकर, प्रेमलता अग्रवाल, अनिता अनंतवार, राजू पाटील बोळसेकर, सुधाकर देशमुख, बालाजी ढगे, अमोल ढगे, मारोती मनुरकर, पि.एन. धसाडे, अमित पटकुटवार, राजेंद्र किशनर...