कवळे गुरूजी यांनी नायगाव विधानसभा भागातील शेतक-यांना आर्थिक बाजुने भक्कम केलात ...माजी मंञी डि.पी.सावंत यांचे प्रतिपादन
वाघलवाडा साखर कारखान्याचा दुसरा बॉयलर प्रदीपन सोहळा संपन्न प्रगतशील शेतकरी नरहरी लक्ष्मण चव्हाण यांनी सहपत्नीक केली बॉयलर पूजा.. उमरी (बातमीदार) नायगाव विधानसभा मतदार संघात या भागात सिंचनाची सोय असल्या कारणाने शेतक-यांसाठी गुळपावडर व साखर कारखाने उभारून शेतक-यांचे व बेरोजगाराचे भले केलात त्यात व्यापारपेठ वाढुन व्यापाराचे भले केलात.कमी खर्चात विक्रमी ऊसाचे उत्पादन कसे काढले पाहिजे हे भागातील शेतक-यांना समुहाकडुन बांधावर जाऊन माहिती देता.यात शेतकरी हा यांचा फायदा घेत ऊसाचे विक्रमी उत्पादन काढुन आर्थिकबाजुने सक्षम होत आहे.कवळे गुरूजी तुम्ही भागातील शेतकरी आर्थिक बाजुने सक्षम झाला पाहिजे यासाठी अहोरात्र परिश्रम घेत असल्याने तुमचे स्वप्न सत्यात उतरत आहात. जसे पुर्वी या भागातील शेतकरी आर्थिक बाजुने सुधारला पाहिजे यासाठी वाघलवाडा साखर कारखाना स्वर्गीय शंकरराव चव्हाण व नेते अशोक चव्हाण यांनी हस्सेकर यांच्या माध्यमातून उभारले. हस्सेकर यांच्या निधनाने बंद कारखाना कवळे गुरूजी तुम्ही रितसर विकत घेऊन अवघ्या दोन महिन्यात च...